एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

 

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi
एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये एकीचे बळ मराठी निबंध लेखन / Ekiche Bal Essay In Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Ekiche Bal Essay In Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.

वर्तमानपत्र चाळता चाळता समोर लक्ष गेलं… पाच-सहा काळ्या बा… एका मोठ्या झुरळाला ओडून त्यांच्या इच्छित ठिकाणी न्यायच्या प्रयत्नात होत्या. मनात आलं. ह्या मुंग्यांचा जीव तो केवढा नी…त्यांच्या पुढे ते अवघड काम सहजसाध्य आहे. सहकारात संघशक्ती आहे. म्हटलेच आहे

“संहतिः कार्यसाधिका!”

खरोखर सहकाराविना तरणोपाय नाही। निसर्गातील प्राणिमात्र आपल्याला अनेकवेळा हा धडा घालून देतात. पोळ्यापाशी मध घेऊन येताना मधमाश्या कधी पाहिल्यात? राणीमाशी, कामकरी माशी… सर्वच जण किती बिनबोभाट काम पार पाडत असतात..

लहानपणापासूनच आपणा सर्वांना इसापच्या पंचतंत्रातल्या गोष्टी तर माहीत आहेतच. पारध्याच्या जाळीतून निसटण्याची पक्ष्याची किमया, कबुतराने टाकलेल्या वाळलेल्या पानाने वाचलेली पाण्यातली मुंगी, विभाजनामुळे सिंहाकडून आत्मघात ओढवून घेणारे बैल…ह्या सर्वांतून तात्पर्य काय तर… सहकार व एकी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू! सहकारातूनच एकी साधता येते व एकी असेल तरच सहकार्याची भावना दृढ होते.

माणूस तर पहिल्यापासूनच जमावाने राहणारा समाजप्रिय घटक. मग तो अश्मयुगातील शिकार करणारा असो वा २१ व्या शतकातील संगणक युगातील असो. त्याची उन्नती व सुखसमृद्धी हे सहकाराचेच फलित आहे. एकीच्या बळावर अशक्य कोटीतील गोष्ट नुसतीच शक्य होते असं नाही तर ती सुकर व सुलमही होते. एकटा मनुष्य एकट्याच्या मर्यादित शक्तीने, साधनसामुग्रीने सर्वांगीण विकास करून घेऊ शकत नाही, हे सत्य आहे, म्हणतात ना-

‘गाव करील ते राव काय करील!”

शरीरातील इंद्रियांबद्दल बोलायचे तर एकी हाच त्यांच्या कामाचा पाया आहे. शरीरात एका इंद्रियाच्या असहकाराने मोठा हाहाकार माजू शकतो.

सहकारी चळवळीमुळे श्रमांची विभागणी होते व सामाईक सत्ता निर्माण होते, रशियात सामुदायिक व सामाईक पद्धतीवर शेतीसुद्धा केली जाते. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजर्षी शाहू महाराजांनी तर पूर्वीच, सहकारी तत्त्वाचा वापर शेती व उद्योगात करून आर्थिक विकास घडवून देण्यासाठी गरीब शेतकन्यांनी एकमेकांना मदत केली व पैसा गोळा केला; तरच शेतकरी कर्जमुक्त होणे शक्य आहे, हा विचार बिंबवून जागृती निर्माण केली.

अशा तन्हेने प्रवरानगर येथे सहकारी क्षेत्रातील देशातला पहिला साखर कारखाना उभा राहिला. त्यांच्या अनुषंगाने प्रवरानगरला मेडिकल कॉलेज, इस्पितळे, दूध वितरण संस्था, सहकारी बँका, पतपेढ्या, पोल्ट्या सुरू आहेत. हल्ली मोठमोठ्या हॉस्पिटलांमध्ये अत्याधुनिक उपकरणे, ‘सर्जिकल’ साधनसामुग्री डॉक्टर सहकारी तत्त्वावर विकत घेतात, त्यामुळे न्यूरोसर्जरी, आयसर्जरी आपल्या देशात सर्रास सुरू झाली. अन्यथा एकटा शल्यविशारद डॉक्टर अर्थसहाय्याअभावी ही उपकरणे कशी घेऊ शकेल ?

“United we stand, divided we fall”

हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.

सहकाराचे एकीचे हात एकत्र आले की, प्रचंड शक्ती जमा होते. मग धनाचीही उणीव भासत नाही आणि सर्वांनी मिळून दगड आणले तर लंकेपर्यंतचा सेतूही वानर बांधू शकतात. आपण तर माणसे! ‘लगान’ सिनेमातही दाखवण्यात आलं होतं, की ‘एक उठी तो ऊंगली उड्डी, पाँचो मिली तो बन गयी मुठ्ठी सिनेमात भुवनला एकट्याला ब्रिटिशांशी लढताना किती सायास पडत होते पण एकी झाल्यावर त्यांनी गावातून ब्रिटिशांना हाकलले. शेतसारा माफ झाला. म्हणतात ना,

साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा ।

मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढाना ।।

समान व्यावसायिकांची एकी वा संघटना असेल तर त्यांच्या मागणी हकांना आवाज राहतो डॉक्टर्स एकत्र आले, तर आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया अशी विधायक कामे समाजात होतात.

“एकजूट ही आदर्श आमची उत्कृष्टाप्रत जाण्यासाठी”

हे ब्रीदवाक्य ठरवून एकीतच राहणं नक्कीच फायद्याच. या एकीतूनच जन्माला येते राष्ट्रीय एकात्मता. सहकार चळवळीतून ग्रामीण विकास, ग्रामीण रोजगार योजना अस्तित्वात आल्या. शहरातील निवासाची समस्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निर्मिती होऊन सोडविली गेली. राष्ट्राराष्ट्रातही अर्थसहाय्य, तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री याबाबतीत सहकार्य केले जाते. भारतातील भिलाईचा पोलाद कारखाना रशियन तंत्रज्ञांच्या सहकार्याने उभारला गेला. राकेश शर्मा हा आपला अंतराळवीर रशियाच्या सहकार्यामुळेच अवकाशात भ्रमण करून आला. अशा प्रकारे हीरो होंडा ह्यांची एकी= हीरोहोंडा रस्त्यांवरून पळते. एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ।।” ‘हाच एक वैश्विक सुखाचा आणि विकासाचा मूलमंत्र आहे.

… जर साथ मिळाली सहकाराची

तर गुंफण सजते हातांची

मैत्री जडते मनामनांची

सुफळ सांगता कार्यसिद्धीची!

 

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi
एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

 

एकीचे बळ 10 ओळी निबंध मराठी 

 

मुलांना शालेय काळात एकजूट राहण्याचे महत्त्व शिकवले जात असतानाही, त्यांना सराव करण्यासाठी योग्य प्रकारचे वातावरण दिले जात नाही.

आजच्या जगात इतकी स्पर्धा आहे की “ऐक्य ही शक्ती आहे” ही संकल्पना लोक विसरले आहेत. ते केवळ यशाचा पाठलाग करीत आहेत आणि त्यांच्या तोलामोलाला एकमेव अडथळा म्हणून पहात आहेत. स्पर्धा शाळा स्तरावरूनच सुरू होते.

मुलांना चांगल्या नैतिक मूल्यांसह पाळले जावे त्या वेळी त्यांचे पालक त्यांचे वर्गमित्र, चुलतभावा आणि मित्रांसह त्यांची तुलना करण्यात व्यस्त आहेत.

ते सतत आपल्या मुलांबद्दल विचार करतात आणि इतरांपेक्षा पुढे राहण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात आणि म्हणूनच या सर्व मुलांनी फक्त आपल्या मित्रांच्या मदतीचा विचार केला पाहिजे.

त्यांचे वर्गमित्र आणि मित्रांमध्ये मिसळण्याऐवजी ते त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात आणि पुढे जाण्यासाठी संधी शोधतात.

ही वृत्ती काळानुसार अधिक दृढ होते. कॉर्पोरेट कार्यालये किंवा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आजकाल सर्व गोष्टींची स्पर्धा अत्यंत कठीण झाली आहे.

जरी एखादा प्रकल्प एखाद्या टीमच्या सर्व सदस्यांकडून हाताळला जात असला तरी, प्रत्येकजण संघ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याकडे लक्ष देण्याऐवजी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो.

 

एकीचे बळ मराठी कविता । Ekiche Bal Marathi Poem 

 

हातात हात उरी गगनभेदी स्वप्न

एकीचे बळ असतेच मुळी अभेद्य

चालायचे तर सर्वांनाच आहे, तर

स्पर्धेच्या वाटेवरी सोबतीने चालू

विरोध करता कुणी सोबतच भिडू

भिडायचे कशाला,

सोबतीला भिडायचे बळ कोणा

अशी एकीची सामर्थ्य गाधा

कानाकोपऱ्यातून वाहते

ना पराभवाची भीती त्यास

ना तिला भेदणारी कसली ताट

 

एकीचे बळ निबंध विडियो मध्येमातून 

Video credit : Learn With Jeevan Youtube channel 

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi 
एकीचे बळ 10 ओळी निबंध मराठी 
एकीचे बळ मराठी कविता । Ekiche Bal Marathi Poem 
मराठी कथा लेखन एकीचे बळ

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

व्यवसाय शिक्षण काळाची गरज निबंध

माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध

श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay

मराठी भाषेची कैफियत निबंध । Marathi Bhashechi Kaifiyat Essay  

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

 

टीप :

1 ) एकीचे बळ मराठी निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment