हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध 

हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध  

 

हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध 
हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध लेखन / Hunda Ek Samajik Samasya / Ek Anisht Pratha Essay in Marathi  100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत.

“काय शांताबाई, सुनेला काल दवाखान्यात नेले होते ना, हुडा झाला की पेढा ?

“हुंडा “। “हात तुझी, बरं जाऊ दे. दुसरीही फिंदरीच जन्माला आली म्हणायचं. तिचं नाव आता ‘नकोशी’च ठेवा. म्हणजे पुढची मुलगी व्हायची नाही, तिथी तिघींना हुंडा देणार कुठून ?”

शाळेत जाताना दोन स्त्रियांमधला हा संवाद मी ऐकला नी कुणालातरी हुंडा झाला म्हणजे मुलगी झाली, हे लक्षात आलं. शांताबाईचा चेहरा पार उतरलेला होता. मला खूप वाईट वाटलं. ‘त्री-पुरुष समानता’ – परवाच बाईंनी शाळेच्या निबंधाच्या वहीत निबंध लिहायला सांगितला होता. वाटलं, नुसता निबंध लिहून काय उपयोग ? या लहान वयात आमच्या मनात जे विचार येतात, ते विचार ही मोठी माणसं आचरणात केव्हा आणणार? मुलगा म्हणजे वंशाचा दिवा….. मग मुलगी म्हणजे पणती का नाही? किती साधं सोप्पं आहे. फक्त मुलाच्या लग्नातः हुंडा घ्यायचा नि मुलीच्या लग्नात द्यायचा एवढाच काय तो फरक. त्यामुळे गरीबाच्या घरात मुलगी म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्री’.

हुंडा नेमका कधी व कुणी सुरू केला कोणास ठाऊक. आणि ही जाचक प्रथा अजूनही कायद्यानं बंद का होत नाही कुणास ठाऊक, निव्वळ चंगळवाद, भोगवाद, पैशाचा अतीव मोह, आपल्या सुबत्तेसाठी दुसऱ्याची गळचेपी करण्याची वृत्ती ह्यातूनच हुंडा पुढे पुढे जात राहिला. जिनकष्टाचे, ताटावर आणून वाढलेल सुख म्हणजे मुलाच्या लग्नातला हुंडा असंच समीकरण होऊन गेलं. हुंड्याच्या रूपात मुलाची आई ‘वरमाई’ मनात येईल ते मागून घेते.

आपला वरचष्मा सिद्ध करण्यासाठी उंची साड्या, सोफासेट, टी.व्ही., धुण्याचे मशीन, मोटार गाड़ी, शोकेस, व्ही. सी. आर., संगणक, सोन्याचांदीचे दागदागिने… अगदी राहायला फ्लॅट सुद्धा. अर्थात ‘देणारे आहेत म्हणून घेणारेही आहेत’. हे सर्वज्ञातच आहे. एका गोष्टीचं मात्र राहून राहून वाईट वाटतं नि आश्चर्यही वाटतं की हुंड्याचा बळी जी स्त्री ठरते, तिचा बळी घेणारीही सासरघरची स्त्री किंवा स्त्रियाच असतात ह्याच !

स्त्रियांनाच हाव असते दागिन्यांची रोख रकमेची, आलीशान घराची. लग्न होऊन आपल्या घरात आलेली सून त्यांना टाकसाळच वाटते. लग्नाचा मुहूर्त टळून जाऊ लागला, तरी हुंड्यापायी रुसून बसलेल्या सासवा व नणंदा तुमच्या आमच्या ऐकीवात असतात. बापरे! सून सासूच्या रुपात स्त्रियाच स्त्रीच्या शत्रू होतात! हे शत्रुत्व मग, ती सून जिवानिशी मरेपर्यंतही जात किंवा कित्येक ठिकाणी शारीरिक, मानसिक छळाला सामोरं जात आयुष्य काढणाऱ्या सुनादेखील जिवंतपणी मरण भोगतात ते संपेपर्यंत!

आमच्या शेजारी राहणाच्या सुनंदाताईचे उदाहरण तर सर्वांच्याच जिवाला चटका लावणारे व डोळ्यात पाणी आणणारे आहे. मला तिच्या लग्नाचा दिवसही आठवतो. संसाराची स्वप्न पाहात ताई सासरी गेली. दिवस, महिने जणू काही पंख लावून निघून चालले होते. एक दिवस रडवेल्या चेहऱ्याची सुनंदाताई बन्हाड्यात बसलेली पाहिली. तोंडावरचं तेज मावळलं होतं. शब्द मुके झाले होते. डोळे बिजले होते. छातीमध्ये एक प्रचंड वणवा धुमसत होता, असं वाटत होते. नंतर कळले की, अशी स्थिती होण्याचं कारण म्हणजे ताईच्या सासूबाईंनी तिच्या वडिलांकडे पाच लाखांची मागणी केली होती.

आपल्या वडिलांची ऐपत ताई ओळखून होती. आधीच लग्नात घातलेले सर्व दागिने तिने सासूबाईंच्या ताब्यात दिले होते. पाच लाखासाठीचा सर्व जाच ताई निमूट सहन करीत होती. झुक्त, मरत, परत उभी ठाकत त्यांच्यातच राहात होती. हातात जणू फुललेले निखारे घट्ट धरलेले होते. एक दिवस तिने पत्रात लिहिले,

हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध 
हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध

 

‘डोंब आगीचा उसळे मनात, देहात उरात केवळ क्षणात…. साहू कसा हा अन्याय मनात? होईल राखही पळभरात ” भिडे गगनात

काही दिवसांनी ती आईला म्हणाली,

अरे रडता रडता डोळे भरले भरले.

आसू सरले सरले आता हुंदके उरले

… आणि थोड्याच दिवसांनी ती भयानक बातमी आमच्यापर्यंत येऊन थडकली. ‘सुनंदाताई गेली.’ तिचे शवविच्छेदन झाले. मृत्यूचे कारण होते – विषबाधा. सासूच्या पाच लाखांच्या मोहाने ताईचा बळी घेतला होता.

मन विषण्ण झालं. ताईसारख्याच अशा किती बहिणी सासरघरी हुंड्यासाठी त्रास सहन करीत असतील कोणास ठाऊक. गिधाडांनी मारलेल्या टोचींनी घायाळ झालेल्या बहिणींची ही लांबच लांब रांग मला दिसेना. कधी त्यांना विष दिलं जात असेल तर कधी त्यांचं कोमल शरीर अभी ज्वाळांनी वेढलं जात असेल जिवंतपणी मारण्यासाठी! असहाय्य मंजुश्री सारडा किती घरात आपलं मरण ओढवून घेत असतील! या जीवघेण्या हुंडापद्धतीला…. रॅगिंगला… जबाबदार कोण? हा समाज व समाजातले घटक आपण!

वास्तविक १९६१ पासून भारतात हुंडाप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. पण कायद्यातून पळवाटा निघतात. शिवाय हुंडा घेणाऱ्यास शासन कडक नाही, सौम्य देण्यात येते. परत एकदा फुले, राजा राममोहन राय यांनी जन्म घ्यावा वाटते आपल्या लेकींसाठी ‘नारी समता मंच’ सारख्या महिला संघटना आपल्या परीने तक्रार करणाऱ्या मुलींसाठी मदत कार्य करतात, पण भारतीय संस्कृती जपणाऱ्या ह्या सहनशील मुली आपल्या सासरविरुद्ध लवकर तक्रारही करीत नाहीत. त्यांचेही प्रबोधन होणे जरुरीचे आहे कारण अन्याय सहन करणाराही तितकाच गुन्हेगार असतो.

एकदा वाटतं, एकविसाच्या शतकातल्या सुना असणार आहेत अन्यायाविरुद्ध दंड थोपटणाऱ्या पण सुशिक्षित. त्यामुळे मनानं मृदुही! सासवा पुरोगामी विचारांच्या त्यामुळे सासूबाईंना म्हणावंसं वाटतं.

सासू होणार म्हणून नको सैरभैर होऊ

सून येईल शिक्षित असेल मेणाहून मऊ

चुकभूल होता तिची नको रागाने रागवू

जिव्हाळ्याच्याच थेंबांनी नातं प्रेमाचं भिजवू.

 

मग राहणारच नाहीत हुंडाबळी नी जीवघेणा हुंडा ! कुटुंबे एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदतील. मोडकळीला आलेली घरे माणसे सांधली जातील. प्रेमामध्ये बांधली जातील.

 

हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : Daily Marathi Education Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

हुंडा एक अनिष्ट प्रथा निबंध । Hunda Ek Anisht Pratha Essay
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay
हुंडा एक अभिशाप निबंध। Hunda Ek Abhishap Essay

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

व्यवसाय शिक्षण काळाची गरज निबंध

माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध

श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay

मराठी भाषेची कैफियत निबंध । Marathi Bhashechi Kaifiyat Essay 

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

 

टीप :

1)  हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

1 thought on “हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध ”

Leave a Comment