महात्मा जोतीराव फुले – Mahatma Jotirav Phule

महात्मा जोतीराव फुले – Mahatma Jotirav Phule

 

महात्मा जोतीराव फुले - Mahatma Jotirav Phule
महात्मा जोतीराव फुले – Mahatma Jotirav Phule

 

“विदविना मति गेली मतीविना नीति गेली।

नीतीविना गति गेली। गतीविना वित्त गेले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”

          किती मोजक्या शब्दांत जोतीरावांनी येथे विदधेचे महत्त्व सांगितले आहे कारण स्वतः त्यांना विदधा मिळवायला खूप त्रास पडला होता. १८२७ मध्ये माळी समाजातील गोहे कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. बालवयातच त्यांची आई देवाघरी गेली आणि आईचे प्रेम त्यांना त्यांच्या वडलांनी, गोविंदरावांनीच दिले. जोती त्यांच्या प्राणाचा तुकडाच होता. शिकत असतानाच विविध अनुभवांतून जोतीरावांना भोवतालच्या समाजातील अनिष्ट प्रथा लक्षात आल्या. मोठ्या कष्टाने त्यांनी इंग्रजी विद्या संपादन केली आणि भरपूर वाचन करून ते बहुश्रुत झाले. शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या जोतीरावांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली.

प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीला शिकवले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. या सावित्रीची त्यांना जन्मभर साथ मिळाली. जोतीरावांनी स्त्रियांना विशेषतः शूद्र, अतिशुद्र, शेतकरी स्त्रियांना शिकवण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा अनेक शाळा काढल्या. त्यासाठी समाजाचा विरोध, दगडगोटे, शेणमाती यांचा मारा सहन केला. पण १८४८ साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य सतत चालू ठेवले.

महात्मा जोतीराव फुले - Mahatma Jotirav Phule

जोतीराव फुले यांना जे वाटले, ते त्यांनी बोलून दाखवले, त्याप्रमाणे कृती केली म्हणून आचार्य अत्रे त्यांचा उल्लेख ‘कर्ते सुधारक’ असा करतात. जोतीरावांच्या काळात म्हणजे शेसव्वाशे वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. विशेषत: विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक दिली जात असे. त्यांचे केशवपन केले जाई. ही अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीरावांनी न्हाव्यांचाच संप घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी केली. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. स्त्रियांप्रमाणेच समाजातील पीडित असा दुसरा वर्ग म्हणजे दलितांचा वर्ग.

जोतीरावांनी त्यांचीही दुःखे हलकी करण्याचा यत्न केला. त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून त्यांची स्थिती सुधारावी म्हणून जोतीरावांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक लिहून सरकारला अनेक उपाय सुचवले. १८७३ मध्ये फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.

समाजातील उद्दाम वर्गाला सुनावताना ते सांगतात, “ईशे केलें नाही तुजसाठी सर्व । करू नको गर्व प्राण्यांमध्ये ।।” आपले विचार मांडताना जोतीरावांनी ‘अखंड’ रचले. त्यांत ते आपल्या देशबांधवांना मौलिक संदेश देतात –

जगाच्या कल्याणा देह कष्टवावा ।

कारणी लावावा । सत्यासाठी ।|

 

अधिक माहितीसाठी 

—————————————————————————————————————————-

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

1 thought on “महात्मा जोतीराव फुले – Mahatma Jotirav Phule”

  1. महात्मा जोतीराव फुले हे एक थोर व्यक्ती महत्त्व होते

    Reply

Leave a Comment