माझी आजी- Maji Aaji Nibandh

माझी आजी- Maji Aaji Nibandh

 

माझी आजी- Maji Aaji Nibandh
  माझी आजी- Maji Aaji Nibandh

 

आमची आजी कधीतरी आमच्याकडे येते; पण ती येते तेव्हा आमच्या घरातील सारे वातावरण फुलून जाते. आजी तिच्या नावाप्रमाणेच खरोखर अतिशय आनंदी आहे. हा आनंदच ती आपल्या भोवतालच्या सर्वांना सदैव वाटत असते. पंच्याहत्तरी ओलांडलेली आजी कधीच कुठल्याही गोष्टीची तक्रार करत नाही. मी एकदा तिला विचारलं, “आजी, तुझे हातपाय कधी दुखत नाहीत का ग?” त्यावर हसून ती म्हणाली, “अरे, आहे कुणाला वेळ त्या हातापायांकडे पाहायला!” हेच आजीच्या उत्तम आरोग्याचे मुख्य गमक असावे.

आजीने आपल्या जीवनात खूप अडीअडचणींना, संकटांना तोंड दिलेले आहे. माझे बाबा आणि आत्या लहान असतानाच आजोबा वारले. आजीवर मोठे संकटच ओढवले. राहत्या घराशिवाय आजीजवळ काहीच नव्हते. पण मोठ्या धैर्याने तिने आपल्या लेकरांना मोठे केले. त्यांना उत्तम शिक्षण दिले आणि आपल्या पायावर उभे केले. माझ्या बाबांना वाटते की, आता आजीने कष्ट करू नयेत, आपल्याजवळ राहावे. पण आजी हसत हसत बाबांचे म्हणणे टाळते.

“ अरे, आपण सर्वजण शहरात राहिलो तर माझ्या त्या गावाला कोण सांभाळणार रे?” असा आजीचा बाबांना सवाल असतो.आजीचे आपल्या त्या छोट्याशा गावावर खूप प्रेम आहे, कारण तिच्या कठीण दिवसांत त्या गावानेच तिला आधार दिला.

माझी आजी- Maji Aaji Nibandh
माझी आजी- Maji Aaji Nibandh

 प्रथम तिने छोट्यांसाठी शाळा काढली. मग तिने गावातल्या महिलांना शिवणकाम, भरतकाम शिकवण्यास सुरवात केली. त्यातूनच महिला उदयोग संस्था सुरू झाली आणि नावारूपाला आली. आता आजी बालकांसाठी पाळणाघर आणि संस्कारवर्ग चालवते, तर वृद्धांकरता ‘सावली’ नावाचा वृद्धाश्रम तिने सुरू केला आहे. आजीकडे जातो तेव्हा तिचा दैनंदिन कार्यक्रम बघून आश्चर्य वाटते.

चोवीस तासांपैकी पंधरा-सोळा तास ती काम करत असते. रात्री दोन तास ती वाचन करते. पण त्यांत पोथ्यापुराणे नसतात हं ! म्हणून तर आजी विशेष शिकलेली नसतानाही ती बहुश्रुत आहे. विज्ञान क्षेत्रात, वैदयकीय क्षेत्रात येणाऱ्या नव्या नव्या गोष्टींची ओळख करून घेण्याची तिला आवड आहे.

आजीची स्वतःची राहणी अतिशय साधी, खाणे साधे व मर्यादित; पण आम्ही गेल्यावर मात्र ती निरनिराळे पदार्थ करून आम्हांला खाऊ घालते; तेव्हा तिच्या सुगरणपणाची कल्पना येते. लहानात लहान, मोठ्यात मोठी होणारी ही आजी सर्वांना हवीहवीशी वाटते. आजीचे कर्मकठोर जीवन हाच माझ्यापुढील आदर्श आहे..

अधिक माहितीसाठी 

—————————————————————————————————————————-

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

1 thought on “माझी आजी- Maji Aaji Nibandh”

Leave a Comment