Marathi Grammar। मराठी व्याकरण

Marathi Grammar। मराठी व्याकरण

 

Marathi Grammar। मराठी व्याकरण
Marathi Grammar। मराठी व्याकरण
मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

उत्तर – मराठी भाषेचे सपस्टिकरण करणार शास्त्र म्हणजे मराठी व्याकरण होय .

 

वर्ण म्हणजे काय ?

बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात.

ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

बोल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत त्यांना ‘ध्वनी चिन्हे’ किंवा ‘अक्षरे’ असे म्हणतात.

मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.

वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत :

(1) स्वर

(2) स्वरादी

(3) व्यंजने

 

स्वर म्हणजे काय ? 

(1) ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात.

(2) या वर्णमालेतील ‘अ’ पासून ‘औ’ पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात.

(3) स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

(4) स्वर म्हणजे नुसता सुर.

स्वरांचे प्रकार :

(a) उच्चारावरून पडणारे दोन प्रकार

(1) हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना ‘हस्व स्वर’ म्हणतात.

उदा. – अ, इ, उ, ऋ, ऌ

(2) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना ‘दीर्घ स्वर’ म्हणतात.

उदा. आ, ई, ऊ

(b) उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार

(1) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.

उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ

(2) विजातीय स्वर : भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.

उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ

 

स्वरादी म्हणजे काय ? 

ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, त्यांना स्वरादी म्हणतात.

उदा – अं, अः

अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.

यात अनुस्वार (.) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.

अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना ‘स्वरादी’ असे म्हणतात.

 

व्यंजन म्हणजे काय ? 

ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात.

(1) मराठी वर्णमालेतील ‘क, ख… पासून ह, ळ’ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत.

(2) व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.

(3) आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात ‘अ’ हा स्वर मिसळुन आपण त्याचा उच्चार करतो.

उदा : व् + अ = व

 

उच्चारावरून पडणारे प्रकार : 

a) कठोर :

जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, त्यांना कठोर वर्ण म्हणतात.

उदा. क, ख, च, छ, ट, ठ, ज्ञ, थ, प, फ, श, ष, स.

b) मृदु :

ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदु वर्ण म्हणतात.

उदा. ग, घ, ड, ज, झ, त्र, इ, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म, य, र, ल, व, ह आणि ळ

 

उच्चस्थानावरुन  पडणारे प्रकार : 

a) तालव्य :

जेव्हा च, छ, ज आणि झ वर्गातील वर्णांस ‘य’ हा वर्ण लागून उच्चार होत असेल तर त्याचा समावेश तालव्य गटात होतो.

उदा. छडी, छाटणे, छि/छीथू, छूट, छोकरी.

b) दंततालव्य :

जेव्हा च, ज, झ वर्णांस ‘अ’ हा वर्ण लागून त्याचा उच्चार होत असेल तर त्याचा समावेश दंत तालव्य गटात होतो.

उदा. चिरणे, चीड, चेटूक, चैन, झिरपणे, झीट, झेंडू, जीभ, जेवण, जैत

 

Marathi Grammar। मराठी व्याकरण
Marathi Grammar। मराठी व्याकरण

 

संधी म्हणजे काय ?

आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

उदाहरणार्थ – या वर्गाचे विद्यार्थी हुशार आहेत.

या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य ‘अ’ मध्ये ‘आत’ मधल्या आद्य (पहिला वर्ण) ‘आ’ मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो. एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात. एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.

संधीचे प्रकार : 

(1) स्वरसंधी :

जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात.

( स्वर + वर)

उदा : नर + ईश = नरेश

 

(2) व्यंजनसंधी :

एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. ( व्यंजन + स्वर किंवा व्यंजन).

उदा.

अप् + मय = अम्मय

उत् + लंघन = उल्लंघन

 

(3) विसर्गसंधी :

एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन)

उदा.

मन: + रथ = मनोरथ
दु: + काळ = दुष्काळ.

 

शब्द आणि पद :
शब्द म्हणजे काय ?

तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो, वापरतो. हे ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, कही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून ‘बदक’ हा शब्द तयार झाला.

एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.’ बदक पाण्यात पोहते. ‘ हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यां थोडा फरक आहे. ‘पाणी’ हा शब्द आहे. ‘पाण्यात’ हे पद आहे.

वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने ‘शब्द’ असे म्हटले जाते. ‘स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती’ आहे.

मूळ शब्दाला व्याकरणात ‘प्रकृती’ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे जे रुप झाले त्याला ‘विकृती’ असे म्हणतात. विकृती म्हणजे शब्दांच्या मूळ रुपाचे बदललेले रुप. यालाच ‘पद’ असे म्हणतात. वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते.

 

नाम म्हणजे काय ?

जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

उदा.

फळा, खुर्ची, टेबल, हत्ती, चिता, सिंह, नाक, कान, डोळा, संगीता, शीतल, कुसुम

 

नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे :

(1) सामान्यनाम

( 2 ) विशेषनाम

(3) भाववाचक नाम

 

सामान्यनाम म्हणजे काय ? 

ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

(1) विशाल हुशार मुलगा आहे.

(2) चिकू गोड असतो.

(3) माणसाने माणुसकीने वागावे.

वरील वाक्यात ‘मुलगा’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो. तसेच ‘गोड’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही फळाचा लागू पडतो.

अशा प्रकारे ‘मुलगा, गोड’ ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.

सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.

(a) पदार्थ वाचक नाम :

जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा, कि.ग्रॅम मध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात.

उदा. सोने, फोन, पेन, पृष्ठ, वस्तू इ.

 

(b) समुह वाचक नाम :

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.

उदा. कक्षा, समाज, झुंड, भीड इ.

 

विशेषनाम म्हणजे काय ?

एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास ‘विशेषनाम’ म्हणतात.

ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. अनेकवचन आल्यास सामान्यनाम समजावे.

उदा :  रमेश, अक्षरधाम, पेरीस, भारत इ.

विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.

उदा :  विशाल-(व्यक्तिवाचक), मुलगी (जातीवाचक)

 

भाववाचक नाम म्हणजे काय ?

भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :

ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात. हे घटक वास्तुस्वरुपात येत नाहीत.

उदा :  अच्छा, सज्जन, नम्र इ.

भाववाचक नामाचे तीन गट पडतात.

(a) स्थितिदर्शक : स्वतंत्र, गरिबी

(b) गुंदर्शक : सौंदर्य, शांतता

(c) क्रुतिदर्शक : लढणे, उमगणे

 

Video Credits : YJ Academy Youtube channal 

 

वरील मराठी व्याकरण माहिती ही इयत्ता ८ वी , ९ वी , व १० वी च्या विद्यार्थी साठी उपयुक्त आहे . 

marathi vyakaran

english grammar in marathi

vyakaran marathi

mpsc marathi grammar

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

1 thought on “Marathi Grammar। मराठी व्याकरण”

Leave a Comment