Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ?

Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ?

 

Marathi Letter Writing - मराठी पत्रलेखन
      Marathi Letter Writing – मराठी पत्रलेखन

Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ? म्हणजेच,  पत्र हे एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क केला जातो. ( patra lekhan in marathi)  काही लोकांना वाटते की पत्र लेखनात काहीही मेहनत लागत नाही. परंतु वास्तविकतेत आदर्श पत्र लिहिणे ही एक कला आहे. पत्र लेखनात व्याकरणाचे महत्त्व भरपूर असते. पत्र लेखनासाठी वापरली जाणारी भाषा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची असते.

 

Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ?

 

प्रास्ताविक: पत्रलेखन ही एक कला आहे आणि ती सरावाने साध्य करता येते. पत्रलेखनात स्थूलमानाने दोन प्रकार येतात :

 

प्रास्ताविक पत्रलेखन ही एक कला आहे आणि ती सरावाने साध्य करता येते. पत्रलेखनात स्थूलमानाने दोन प्रकार येतात

(१) घरगुती किंवा कौटुंबिक पत्रे

(२) व्यावहारिक पत्रे.

आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे ही घरगुती पत्रे’ होत. पत्र ज्या व्यक्तीला लिहिलेले आहे ती आणि पत्रलेखक यांचे जे नाते असते, त्यानुसार पत्राचा मायना आणि शेवट बदलत असतो. कोणाला कोणता मायना लिहायचा याचा तक्ता पुढे दिला आहे.

सामान्यतः घरगुती पत्रांच्या आरंभी ‘श्री’ लिहिण्याचा प्रघात आहे. फक्त दुःखद वार्ता असलेल्या पत्रावर ‘श्री’ लिहीत नाही.

पत्राच्या सुरवातीला उजव्या कोपऱ्यात स्वतःचा पत्ता व दिनांक लिहावा. घरगुती पत्रात पत्राच्या सुरवातीला स्वतःचे नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्रातील मजकूर सविस्तर व मुद्देसूद असावा. भाषा खेळीमेळीची व घरगुती असावी. पत्र वाचणाऱ्या व्यक्तीला पत्रलेखक प्रत्यक्ष आपल्याशीच बोलत आहे, असे वाटले पाहिजे. (patra lekhan marathi) आईवडलांना मोठ्या माणसांना किंवा शिक्षकांना पत्र लिहायचे असल्यास त्यातून नम्रता व्यक्त व्हावी. घरगुती पत्रांचा प्रारंभ व शेवट अनौपचारिक मजकूर व घरगुती चौकशी यांनी करावे.

व्यावहारिक वा व्यावसायिक पत्राचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्राच्या प्रारंभी पत्ता लिहिताना वर आपले संपूर्ण नाव असावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून पण मुद्देसूद असावा. अनावश्यक गोष्टी टाळाव्यात. या पत्राची भाषा व्यावहारिक असली तरी वाचणाऱ्याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक असावी. काटेकोरपणा हा या पत्राचा आत्मा होय. परिच्छेद अवश्य पाडावेत.

[wpdatatable id=1]

 

[wpdatatable id=2]

 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा .

SSC Marathi Letter Writing
10th Marathi Letter Writing
Marathi Letter Writing Books
Patra Meaning in Marathi

 

आमच्या इतर पत्रलेखन पोस्ट साठी : 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment