Marathi Mhani – मराठी म्हणी १२०+

Marathi Mhani – मराठी म्हणी १२०+

 

Marathi Mhani - मराठी म्हणी १२०+
Marathi Mhani – मराठी म्हणी १२०+

 

१ आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
Meaning:
दुसऱ्यांनी केलेल्या बारीक-सारीक चुका दिसतात, परंतु आपल्या हातून कितीही मोठी चूक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे.

2 आपल्याच पोळीवर तूप ओढणे.
Meaning:
फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

3 आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठे कुठे लावणार?
Meaning:
एकदम फार मोठी आपत्ती आली असताना तिचे निवारण करता येणे शक्य नसते.

4 आयजीच्या जीवावर बायजी उदार.
Meaning:
दुसऱ्याचा पैसा खर्च करुन औदार्य दाखवणे.

5 आयत्या पिठावर रेघोट्या.
Meaning:
दुसऱ्याच्या मिळकतीवर चैन करणे.

6 आयत्या बिळात नागोबा.
Meaning:
दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा स्वत:करिता आयता फायदा घेण्याची वृत्ती.

7 आला चेव तर केला देव नाही तर हरहर महादेव.
Meaning:
नियमीत असे काहीच करायचे नाही.

8 आलीया भोगासी असावे सादर.
Meaning:
आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे त्यानुसार भोगावे लागते, त्याबद्दल कुरकुर करु नये.

9 आले अंगावर, घेतले शिंगावर.
Meaning:
संकटाशी धैर्याने सामना करणे.

10 आवळा देऊन कोहळा काढणे.
Meaning:
स्वार्थासाठी एखाद्याला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे.

11 आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
Meaning:
जेथे जिव्हाळा नाही तेथे प्रेम नाही.

12 आहेर नारळाचा गजर वाजंत्र्याचा.
Meaning:
लहानसे काम करुन त्याचा गाजावाजा मोठ्याने करायचा.

13 आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
Meaning:
आईकडे दुर्लक्ष करणे पण बायकोची काळजी घेणे.

14 आ‌ईची माया अन् पोर जा‌ईल वाया.
Meaning:
फार लाड केले तर मुले बिघडतात.

15 इकडे आड तिकडे विहीर.
Meaning:
दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.

16 इच्छा तसे फळ.
Meaning:
जशी वासना असते तसे फळ मिळते.

17 इच्छा तेथे मार्ग.
Meaning:
इच्छा तीव्र असली की, ती पूर्ण करण्याचा मार्ग आपोआप सापडतो.

18 इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते.
Meaning:
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.

19 इन मिन साडे तीन.
Meaning:
एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.

20 ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
Meaning:
जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच.

21 उंटावरचा शहाणा.
Meaning:
मूर्ख सल्ला देणारा.

22 उंटावरून शेळ्या हाकणे.
Meaning:
आळस, हलगर्जीपणा करणे.

23 उंदराला मांजराची साक्ष.
Meaning:
दोघेही एकमेकांचे साक्षीदार असलेली परिस्थिती.

24 उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
Meaning:
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

25 उकराल माती तर पिकतील मोती.
Meaning:
मशागत केल्यास चांगले पीक येते.

26 उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?
Meaning:
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.

27 उघड्या डोळ्याने प्राण जात नाही.
Meaning:
भलतीच गोष्ट आपल्या डोळ्यादेखत घडत असताना तिचा प्रतिकार केल्यावाचून आपल्याला राहवत नाही.

28 उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती.
Meaning:
जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.

29 उचलली जीभ लावली टाळ्याला.
Meaning:
विचार न करता बोलणे.

30 उठता लाथ, बसता बुक्की.
Meaning:
कायम धाकात ठेवणे.

31 उडत्या पक्ष्याची पिसे मोजणे.
Meaning:
अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परीक्षा करणे.

32 उडदामाजी काळे-गोरे, काय निवडावे निवडणारे?
Meaning:
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी चांगले-वाईट गुण असतात.

33 उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
Meaning:
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.

34 उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
Meaning:
अतिशय उतावळेपणामुळे होणारे मुर्खपणाचे वर्तन.

35 उथळ पाण्याला खळखळाट फार.
Meaning:
ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो.

36 उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.
Meaning:
उद्योगी माणसाला सर्व वैभव प्राप्त करुन घेता येते.

37 उद्योगाचे घरी, लक्ष्मी नांदे परोपरी.
Meaning:
उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते.

38 उधार तेल खवट.
Meaning:
उधारीच्या वस्तूत काही ना काही खराबी किंवा उणीव असतेच.

39 उधारीचे पोते, सव्वा हात रीते.
Meaning:
उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.

40 उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे.
Meaning:
श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी-हाजी करणारेही येतातच.

41 उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
Meaning:
येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

42 उसना पसारा देवाचा आसरा.
Meaning:
सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे.

43 उठता लाथ, बसता बुक्की.
Meaning:
कायम धाकात ठेवणे.

44 उडत्या पक्ष्याची पिसे मोजणे.
Meaning:
अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परीक्षा करणे.

45 उडदामाजी काळे-गोरे, काय निवडावे निवडणारे?
Meaning:
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी चांगले-वाईट गुण असतात.

46 उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
Meaning:
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.

47 उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
Meaning:
अतिशय उतावळेपणामुळे होणारे मुर्खपणाचे वर्तन.

48 उथळ पाण्याला खळखळाट फार.
Meaning:
ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो.

49 उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.
Meaning:
उद्योगी माणसाला सर्व वैभव प्राप्त करुन घेता येते.

50 उद्योगाचे घरी, लक्ष्मी नांदे परोपरी.

Meaning:
उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते.

 

Marathi Mhani – मराठी म्हणी १२०+

 

51 उधार तेल खवट.
Meaning:
उधारीच्या वस्तूत काही ना काही खराबी किंवा उणीव असतेच.

52 उधारीचे पोते, सव्वा हात रीते.
Meaning:
उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.

53 उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे.
Meaning:
श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी-हाजी करणारेही येतातच.

54 उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
Meaning:
येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

55 उसना पसारा देवाचा आसरा.
Meaning:
सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे.

56 ऊन पाण्याने घर जळत नसते.
Meaning:
एखाद्यावर खोटे आरोप केल्याने त्याची बेअब्रू होत नाही.

57 ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
Meaning:
एखादी गोष्ट चांगली असली म्हणून ती फार उपभोगू नये.

58 ऋण फिटले पण हीनता फिटत नाही.
Meaning:
कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधी काढून टाकता येत नाही.

59 ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
Meaning:
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते.

60 एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला.
Meaning:
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.

61 एक घाव दोन तुकडे.
Meaning:
एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल.

62 एक ना धड भाराभर चिंध्या.
Meaning:
सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण.

63 एक पथ दो काज.
Meaning:
एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे.

64 एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
Meaning:
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा.

65 एकटा जीव सदाशिव.
Meaning:
एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते.

66 एकदा कानफाट्या नांव पडले की पडलेच.
Meaning:
लोकांत एकदा नाचक्की झाली की नंतरही लोक त्याच दृष्टीने पाहतात.

67 एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ.
Meaning:
एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो.

68 एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
Meaning:
एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी.

69 एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
Meaning:
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.

70 एका पुताची माय वळणीवाटे जीव जाय.
Meaning:
एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे.

71 एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.
Meaning:
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.

72 एका हाताने टाळी वाजत नाही.
Meaning:
भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही.

 

Marathi Mhani - मराठी म्हणी १२०+
Marathi Mhani – मराठी म्हणी १२०+

 

 1. कुडी तशी पुडी

Meaning:

देहाप्रमाणे आहार असतो.

 

 1. कधी तुपाशी तर कधी उपाशी 
 2. Meaning:

संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.

 

 1. कावळा बसायला अन फांदी तुटायला

Meaning:

परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.

 

 1. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच

Meaning:

कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.

 

 1. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी

Meaning:

कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.

 

 1. कोल्हा काकडीला राजी क्ष्रुद्र

Meaning:

माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.

 

 1. कोरड्याबरोबर ओले ही जळते

Meaning:

निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे

 

 1. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही

Meaning:

निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.

 

 1. काखेत कळसा नि गावाला वळसा

Meaning:

हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.

 

 1. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

Meaning:

क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.

 

 1. खाण तशी माती

Meaning:

आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.

 

 1. खर्‍याला मरण नाही

Meaning:

खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!

 

 1. खाऊ जाणे ते पचवू जाणे

Meaning:

एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.

 

 1. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

Meaning:

परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.

 

 1. खाऊन माजवे टाकून माजू नये

Meaning:

पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.

 

 1. खोट्याच्या कपाळी गोटा

Meaning:

वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.

 

 1. गरजवंताला अक्कल नसते

Meaning:

गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.

 

 1. गर्वाचे घर खाली

Meaning:

गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.

 

 1. गरज सरो नि वैध मरो

Meaning:

आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.

 

 1. गर्जेल तो पडेल

Meaning:

काय केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.

 

 1. गाढवाला गुळाची चव काय?

Meaning:

मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.

 

 1. गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ

Meaning:

मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार

 

 1. गाव करी ते राव ना करी श्रीमंत

Meaning:

व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.

 

 1. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा

Meaning:

मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.

 

 1. गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता

Meaning:

मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.

 

 1. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली

Meaning:

एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.

 

 1. गाढवाच्या पाठीवर गोणी

Meaning:

एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.

 

 1. गुरुची विद्या गुरूला फळली

Meaning:

एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

 

 1. गुळाचा गणपती

Meaning:

गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.

 1. गोगलगाय नि पोटात पाय

Meaning:

एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

 

 1. गोरागोमटा कपाळ

Meaning:

करंटा दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.

 

 1. घर ना दार देवळी बिर्‍हाड

Meaning:

बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.

 

 1. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात

Meaning:

एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.

 

 1. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे

Meaning:

स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.

 

 1. घर पहावे बांधून लग्न पहावे करून

Meaning:

अनुभवाने माणूस शहाणा होतो.

 

 1. घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते

Meaning:

आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.

 

 1. घरोघरी मातीच्याच चुली

Meaning:

सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.

 

 1. घोडे खाई भाडे

Meaning:

धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.

 

 1. चढेल तो पडेल

Meaning:

गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.

 

 1. चालत्या गाडीला खीळ

Meaning:

व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे.

 

 1. चमत्काराशिवाय नमस्कार नाही,

Meaning:

पराक्रमावाचून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.

 

 1. चिंती परा येई घरा

Meaning:

दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.

 

 1. चोर सोडून सान्याशाला फाशी

Meaning:

खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.

 

 1. चोराच्या उलटया बोंबा

Meaning:

स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.

 

 1. चोराच्या मनात चांदणे

Meaning:

वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

 

 1. चोरावर मोर

Meaning:

एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे

 

 1. जळत्या घराचा पोळता वासा

Meaning:

प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.

 

 1. जलात राहुन माशांशी वैर करू नये

Meaning:

ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये

Marathi Mhani - मराठी म्हणी १२०+

 

अधिक माहितीसाठी 

—————————————————————————————————————————-

मित्रांनो या म्हणी मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

Leave a Comment