Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंध

Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंध

 

Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंधhi  
Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंधarathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये मी आमदार झालो तर मराठी निबंध लेखन / Mi Amadar Jhalo Tar Essay 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत कल्पनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Mi Amadar Jhalo Tar Essay या विषयावर निबंध बघणार आहोत.

… 

आमची एकूण दीडशे झोपड्यांची वस्ती एसआरए योजनेखाली आमच्या झोपड्यांचा विकास जाहीर झाला आणि आमच्या वस्तीचे वातावरण ढवळून निघाले. आमच्या समितीच्या सदस्यांमध्ये अनेक गट पडले. एकमेकांवरचा विश्वास उडाला. लोकांमध्येही गट पडले. कुरबुरी, मांडणे होता होता मारामाच्या सुरू झाल्या. काही गुंड येऊन आम्हांला झोपड्या रिकाम्या करण्यासाठी धमक्या देऊ लागले.

बिल्डर रोज वेगवेगळ्या कल्पना मांडून भांडणे लावत होता. आमच्या समितीच्या तीन पदाधिकान्यांना गुंडांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. पोलीस तक्रार लिहून घेईनात. आमदारांकडे गेलो. वर लक्ष घालेनात सगळेजण म्हणू लागले, “बिल्डरांनी सगळ्यांना खिशात घातले आहे. तेच आमदारांना खासदारांना जैसे चारून गप्प बसवतात ” काही दिवसांनी तर ‘झोपड्यांना आता जाळूनच टाकणार’ अशा धमक्या येऊ लागल्या आणि गोड पाणीच पळाले!

मी सुन्न होऊन सर्व पाहत होतो. कसली लोकशाही ही ? लोकप्रतिनिधी गुंडांना सामील झालेत ? की गुंडच राजकारणात शिरले ? सज्जन लोक राजकारणापासून लांब राहतात. म्हणूनच दुर्जनांनी राजकारण ताब्यात घेतले आहे. ते काही नाही. आपणच राजकारणात जायला हवे. आपणच आमदार व्हायला हवे. मीच आमदार होणार. या विचाराबरोबर माझ्या मनात चांगल्या आमदाराची कल्पनाचित्रे तरळू लागली.

मला आमदारपदासाठी पात्र व्हायला अजून सात आठ वर्षे आहेत. हे चांगलेच झाले. मला भरपूर तयारी करता येईल. मी योजना आखलेली आहेच. सर्वप्रथम ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य शासनाची कार्यालये या सर्वाच्या कार्यपद्धतीचा मी बारकाईने अभ्यास करीन.

नागरिकांना या सर्व कार्यालयांमध्ये कोणकोणत्या कामांसाठी यावे लागते, त्यांची यादी करीन. प्रत्येक कामाच्या कार्यवाहीचा मार्ग बारकाईने समजावून घेईन. सर्व कारभार ऑनलाईन करण्याचा आग्रह धरीन. यामुळे कोणत्या कामासाठी नागरिकांची कोणत्या टप्प्यांवर अडवणूक होते. हे सहज कळेल. बेपर्वाई व भ्रष्टाचार यांना जेथल्या तेथे ठेचले जाईल.

या कार्यपद्धतीची मी माहिती घेऊन थांबणार नाही. गावागावात या माहितीचा प्रचार करीन. लोकांना जागरुक करीन. मुख्य म्हणजे लोकांचे प्रबोधन करीन: स्वतः ची कामे पटकन व्हावीत. आपला फायदा व्हावा म्हणून लोक स्वतःहून उगाचच लाच देऊ करतात. कायदा मोडून कामे करून घेऊ पाहतात. यातच भ्रष्टाचाराची मुळे आहेत.

मी या प्रवृत्तीविरुद्ध लोकजागृती करीन. जनतेच्या मनात नीतीबद्दल चाड असेल, तरच ती सरकारमध्येही निर्माण होईन कार्यालयेसुद्धा नीतीने वागू लागतील, हे लोकांना प्रथम शिकवले पाहिजे तेच मी करीन. शिधावाटप कार्यालये, पोलीस ठाणी व हॉस्पिटल येथील कार्यपद्धतीमध्येही मी काटेकोरपणा आणण्यास भाग पाडेन, लोकांनी शिस्त पाळलीच पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी लोकांशी सौजन्यानेच वागले पाहिजे.

 

Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंधhi 
Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंध

 

लोकांना एक मिनिटसुद्धा अकारण थांबावे लागता कामा नये. तसेच, निर्धारित शुल्कापेक्षा एक पैसाही जास्त घेतला जाता कामा नये यासाठी मी चळवळच उभारीन. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत करीन. पात्र लाभार्थीना त्यांचा फायदा मिळवून देईन.

विभागवार नागरिकांच्याच दक्षता समित्या स्थापन करीन. या दक्षता समित्यांचे कार्य कोणते ? शासकीय योजनांची अंमलबजावणी होताना काही समाजकंटक लाभार्थीना वंचित ठेवतात. योजनांमध्ये अडथळे आणतात, अशांना चाप लावण्याचे काम या समित्यांनी केले पाहिजे.

योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेला जागरूक करणे, त्यांना योग्य माहिती देणे व शासनाला जनतेचे सहकार्य मिळवून देणे हे कार्य समित्यांनी केले पाहिजे आमच्या एसआरए योजनेत दक्षता समिती असती, तर गोंधळ झालाच नसता. बिल्डरांना घोटाळे करता आले नसते.

आणखी बरेच काही करता येऊ शकते. पण मी म्हणलो तेवढे झाले, तरी ते क्रांतिकारक काम ठरेल. मी तर मनातल्या मनात एक निश्चित केले आहे की, राळेगणसिद्धीला जाईन. तेथे अण्णा हजारेंकडून मार्गदर्शन येईन आणि माझ्या कामांचे तपशीलवार नियोजनच आखीन भी एक आदर्श आमदार होऊन दाखवीन.

 

Mi Amadar Jhalo Tar Nibandh in Marathi। मी आमदार झालो तर निबंध

Video credit : MY PERFECT WORDS Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

  • मी आमदार झालो तर निबंध मराठी । Mi Amadar Jhalo Tar Essay in Marathi 
  • मी आमदार झालो । Mi Amdar jhalo 
  • समजा मी आमदार झालो तर । Samaja Mi Amadar Jhalo Tar

 

आमचे इतर निबंध पोस्ट : 

मी पाऊस बोलतोय निबंध । Mi Paus Bolatoy Essay

रंग नसते तर निबंध । Rang Nasate Tar Nibandh 

मला लॉटरी लागली तर निबंध

नदी बोलू लागली तर निबंध

 

टीप :

1 ) मी आमदार झालो तर निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

 

Leave a Comment