स्थलांतरित पक्ष्याचे मनोगत निबंध। Occult Essays of the Migratory Bird
मित्रानो , या पोस्ट मध्ये स्थलांतरित पक्ष्याचे मनोगत मराठी निबंध लेखन / Occult Essays of the Migratory Bird 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत आत्मवृत्त निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण स्थलांतरित पक्ष्याचे मनोगत निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत.
…
मी आकाशात पाहताच त्या प्रौढ रोहित पक्ष्याने दोन-तीन घिरट्या घातल्या. किनाऱ्यावर उतरलेले आपले सर्व रोहित बांधव सुखरूप आहेत, याची खात्री झाल्यावर त्याने आपले पंख आणखी विस्तारले, थोडे उंच केले आणि तो समाधानाने अलगद खाली उतरला. आपली लांब मान त्याने ताणली; उंच केली आणि डोके वेगवेगळ्या कोनात फिरवून तो किनाऱ्याच्या पलीकडच्या अंगाला पाहू लागला. तिकडे हजारो माणसांचे थवेच्या थवे पसरले होते. ते पाहून त्याचे सर्वांग अभिमानाने थोडे फुललेच. तो स्वतःशीच, पण जरा मोठ्याने पुटपुटला, “किती भाग्यवान आहोत आम्ही!”
त्याच्या आवाजाने पाच सहा रोहित त्याच्याभोवती गोळा झाले; पण त्याचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो स्वतःशीच बोलत राहिला. “जेथे जातो, तेथे हजारो माणसे आम्हांला पाहायला जमतात. शेकडो कॅमेरे, दुर्बिणी आम्हांला न्याहाळू लागतात. आमच्या विविध हालचाली टिपताना त्यांचा आत्मा तृप्त होतो. खरंच किती देखणं रूप मिळालंय आम्हांला !”
आपल्या सर्व पक्षिबांधवांकडे एकवार पुन्हा अभिमानाने त्याने नजर टाकली आणि तो पुढे बोलू लागला, “काठीसारखे उंच पाय, त्यांवर सावरलेला देहाचा शुभ्र डोलारा शुभ्र पिसांवर पसरलेली गुलाबी रंगाची हलकीशी, मंद छटा. आमच्यापैकी काहींचे पंख तर गडद शेंदरी रंगाचेही असतात. आमची चोच जाड, बाकदार पूर्ण गुलाबी रंगाची… आणि ती तर आमच्या सौंदर्याची पताकाच. लांब असलेली मान वेळावून पाहू लागलो की, काय डौलदार दिसतो आम्ही! चालू लागलो की थेट राजहंसच!” हे बोलता बोलता त्याने राजहंसाप्रमाणे ऐटीत पावले टाकलीही.
तो पुढे म्हणाला, “आणि बरं का, आम्ही आकाशात उड्डाण करतो, तेव्हा कावळ्या- कबुतरासारखे उडत नाही. त्यांना कोणतंच ताळतंत्र नसतं. कोणीही, कसाही, कोणत्याही दिशेने, कोणत्याही वेगाने उडत असतो. आमचं तसं नाही. आम्ही सर्वजण एकसाथ, लयबद्धतेने, एका दिशेने, एकाच वेगाने उडत असतो. किती सुंदर सुंदर आकार निर्माण करतो आम्ही आमच्या थव्यांचे! कधी अर्धवर्तुळ धनुष्यासारखे, तर कधी पतंगासारखे! माणसे मोहित होऊन पाहत बसतात!”
त्याचा आवाज क्षणार्धात खिन्न झाला. “जाऊ दया. ही माणसे फक्त मौजमजेसाठी जमली आहेत. त्यांना आमच्या कष्टांची काय जाणीव असणार? आम्ही सैबेरिया, फ्रान्स, स्पेन इत्यादी देशांतून इकडे येतो. भारतातही काही ठिकाणी आम्ही राहतो. पण आम्ही खरे सैबेरिया- सारख्या प्रांतातीलच. तेथून आम्ही हजारो मैलांचे अंतर कापून इकडे येतो. कधी जमिनीवरून, कधी समुद्रावरून. वाटेत शेकडो संकटांचा सामना करावा लागतो; पण आम्ही येतो. यावं लागतंच.
“हिवाळा सुरू झाला की, उत्तर गोलार्धात प्रचंड थंडी पडते. हिमवर्षाव सुरू होतो. जिकडे तिकडे बर्फच बर्फ, जलाशय गोठून बर्फाचं मैदानच तयार होतं. गवताचं एकही पात उगवत नाही. चिखलातले किडे, अळ्या, वनस्पती व त्यांच्या बिया हे आमचे मुख्य अन्न. मग अन्नाचा कण तरी कुठून येईल ?” त्याने एक उसासा सोडला.
त्याच्या आवाजात आता थोडा आश्चर्याचा स्वर मिसळू लागला होता. “ही माणसे आम्हा स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास का करतात? तसा स्थलांतरीत माणसांचा का करीत नाहीत? उत्तर प्रदेश-बिहारमधून देशभर माणसे जातात. केरळ – तामिळनाडूतूनही जातात. महाराष्ट्रातील माणसे बडोदा, ग्वाल्हेर, इंदूरमध्ये स्थायिक झालेली आहेत.
असे देशभर अविरत स्थलांतर चालले आहे. इतकेच नव्हे, तर युरोप-अमेरिकेत दरवर्षी हजारो भारतीय जातात. हे जगभर चालले आहे. या स्थलांतरितांमुळेच जगभर विकास घडला आहे. माणसांनी या स्थलांतरितांचा अभ्यास करावा. मग त्यांना सत्य उमगेल. त्यांची आपापसांतील भांडणे थांबतील आणि जगात शांतता नांदेल.
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता
-
पक्षाची आत्मकथा
-
स्थलांतरीत पक्ष्यांची गोष्ट
-
मराठी निबंध लेखन स्थलांतरित पक्ष्यांचे मनोगत
-
स्थलांतरित पक्ष्याचे मनोगत निबंध। Occult Essays of the Migratory Bird
आमच्या इतर निबंध पोस्ट :
-
मी पाऊस बोलतोय निबंध । Mi Paus Bolatoy Essay
-
आम्ही संपावर जातो तेव्हा.. निबंध
-
संत जनाबाई निबंध – Sant Janabai Essay
-
दूरदर्शन नफा की नुकसान ? निबंध
टीप :
1 ) स्थलांतरित पक्ष्याचे मनोगत निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .
मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद.