जीर्ण पुस्तकाचे मनोगत निबंध । Jirn Pustakache Manogat Essay 

जीर्ण पुस्तकाचे मनोगत निबंध । Jirn Pustakache Manogat Essay 

 

जीर्ण पुस्तकाचे मनोगत निबंध । Jirn Pustakache Manogat Essay 
जीर्ण पुस्तकाचे मनोगत निबंध । Jirn Pustakache Manogat Essay

 

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये जीर्ण पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध लेखन / Jirn Pustakache Manogat Essay   100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत आत्मवृत्त निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Jirn Pustakache Manogat Essay  या विषयावर निबंध बघणार आहोत.

… 

“बाळा, जरा जपून रे! खूप वेदना होताहेत. अगदी जीर्ण झालो आहे. बघ, बघ माझी पाने बघ कोणत्याही क्षणी फाटतील अशी झाली आहेत.”

मी आज पुस्तक वाचत असताना मी चक्रावूनच गेलो होतो. माझ्या हातातले पुस्तक… माझ्या आजोबांचे पुस्तक… बोलत होते… माझ्याशी बोलत होते! परवाच आजोबांनी मला त्यांची काही जुनी पुस्तके स्कॅन करून संगणकात साठवून ठेवायला सांगितली. मी पहिलेच पुस्तक स्कैन करीत होतो. स्कॅनिंग नीट व्हावे, म्हणून मी ते पुस्तक जरा दाबले मात्र, क्षणार्धात ते कळवळून बोलू लागले.

आता माझे लक्ष त्या पुस्तकावरच केंद्रित झाले होते. ते बोलत होते, “हे बघ बाळा, मी जरूर कळवळलो. मला दुखलेही. पण मी दुःखी झालेलो नाही. मी खुशीत आहे. मी खूप आनंदात आहे. कारण माझा आता कायापालट होणार आहे. मला नवीन जन्म मिळणार आहे. मी आजन्म तरुण राहणार आहे. मी अमर होणार आहे, मला आता मृत्यू नाही… काय म्हणालास ? कसं ? आता? हे बघ या स्कॅन केलेल्या पुस्तकाचा फोल्डर करून तो महाजालावर टाकलास; तर क्षणार्धात मी जगभरात पोहोचेन, जगातल्या कोणत्याही कोपन्यातल्या कोणत्याही माणसापर्यंत मी पोहोचू शकेन.”

मला आता त्या पुस्तकाचा चेहरा दिसत होता. एका अनोख्या सुखाने तो झळाळत होता. त्याच्या बोलण्यातून मला सुखाचा दरवळ जाणवत होता. ते बोलत होते, “आणि मुला माहीत आहे का? छे! छे! तुला हा प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. तुला माहीत असणारच. तुम्ही तरुण मुले माहिती तंत्रज्ञान नुसते जाणता, असे नाही, तर तुम्ही ते जगता आहात. वाचता वाचता एखाद्याला वाटले की, हे पुस्तक डिजिटल स्वरूपात असावे; तर तो तसा प्रयत्न करील. मला डिजिटल स्वरूपात नेईल. असे झाले तर माझा संचार सुलभ होईल. भाग्य भाग्य म्हणतात ते आणखी काय असते रे?”

पुस्तक पुढे बोलू लागले, “बरं का बाळा, आम्हां पुस्तकांची नवीन पिढीतील मुले भाग्यवान आहेत. आता ‘किडल’ सारख्या ‘बुक रीडर’ वर हजारो पुस्तके राहतात. ही आमची नवीन पिढीच. आता या ‘बुक रीडर’ वरील पुस्तके केव्हाही, कुठेही, कधीही वाचता येऊ शकतात. अगदी अंधारातही! हवे तेथे सुरुवात करता येते. आकार लहान-मोठा करता येतो. भूर्जपत्रापासून ते कागदापर्यंत आणि तेथून पुढे इलेक्ट्रॉनिक माध्यमापर्यंतचा हा प्रवास खरेच थक्क करणारा आहे!

“हे बघ बाळा, तू तरी लक्ष देऊन ऐक मी काय सांगतो ते. मी खूप जुनं पुस्तक आहे, माझी निर्मितीच मुळी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी झाली. जे कथानक माझ्या पानापानांतून सांगितले आहे, ते जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीचे आहे! त्यातील माणसे, त्यांचे राग-लोभ-द्वेष, त्यांची आपापसातील भांडणे, हेवेदावे, त्यांचे एकमेकांवरचे प्रेम या सगळ्या भावभावनांचे प्रत्ययकारी दर्शन घडवून मी अनेक वाचकांना विलक्षण आनंद दिला आहे.

माझ्यामुळे शंभर वर्षापूर्वीच्या काळाचे दर्शन घडते. त्या वेळची माणसे, त्यांचे खाणेपिणे, त्यांचे कपडेलत्ते, त्यांचे बोलणे, चालचलणूक, त्या वेळच्या रूढी-परंपरा यांचे माझ्यामुळे प्रत्ययकारी दर्शन घडते. मी वाचकाला भूतकाळात फिरवून आणतो. भूतकाळाच्या दर्शनामुळे वाचकाला वर्तमानकाळाशी तुलना करता येते. रूढी-परंपरांमधील चांगले-वाईट समजून घेता येते. त्यामुळे आपण वर्तमानकाळात कसे वागावे, याचे मार्गदर्शन मिळते. भविष्याचा वेध घेता येतो. केवढे महान मूल्य माझ्यात आहे !”

पुस्तकाचा आवाज आता सद्गदित झाला होता. ते सांगत होते, “आम्ही जे कष्टाचे दिवस काढले, ते आता आमच्या बाळांच्या वाट्याला येणार नाहीत. त्यांची पाने फाटणार नाहीत. त्यांना वाळवी लागणार नाही. त्यांची बांधणी खिळखिळी होणार नाही. आमची बाळे अमरपट्टाच घेऊन जन्मली आहेत. माणसाने निर्माण केलेल्या ज्ञानाच्या प्रसाराचे कार्य आता आम्ही अनंतकाळपर्यंत चालू ठेवू.

 


पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Pustakache Atmavrutta Marathi Essay 

पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Pustakache Atmavrutta Marathi Essay 
पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Pustakache Atmavrutta Marathi Essay
  प्रिय मित्रानो , मी पुस्तक बोलत आहे . माझं मन तुमच्याकडे मोकळ  करण्याचा मी चंगच बांधलेला आहे. बरेच दिवस झाले मनात ठरवले होते . आज मुहूर्त मिळालेला आहे . तर हा मुहूर्त काही मी सोडणार नाही.
लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत तुम्ही पुस्तकांची मदत घेत असतात. कधी वाचण्यासाठी , कधी चित्र बघण्यासाठी , कधी मनोरंजनासाठी , तर कधी तुमची मनस्थिती बदल होण्यासाठी. हे सगळं करत असताना तुम्ही कधी  माझ्या मनाचा तिचा विचार केलेला आहे का? पुस्तकाला कसे वाटत असेल ? आपण त्याची काळजी घेतो का ?आपल्या चुकीच्या वागण्याने पुस्तकाला त्रास होईल का? या गोष्टीचा विचार तुम्ही करायला नको!
कुठेतरी एखाद्याछपाईच्या कारखान्यांमध्ये माझा जन्म झाला. आमच्यावर विविध रंगाने लेखन केले गेले. हे लेखन म्हणजे काही अविचाराने लिहिलेली अक्षरे नव्हे, तर एखाद्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या व्यक्तीने किंवा अनुभवसंपन्न व्यक्तीने लिहीलेले आपले अनुभव यांच्यामध्ये व्यक्त केलेले असतात.
या अनुभवांचा फायदा अनेक लोकांना आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये होतच असतो. माझ्यात लिहिलेली अक्षरे वाचून जर कुणाला फायदा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यातच आमच्या जीवनाचे खरे सार्थक आहे.
आमच्या मुळे होणारा हा फायदा सगळ्यांना मान्य तर आहेच . असे असून देखील आमच्याकडे होणारे दुर्लक्ष मात्र विसरून चालणार नाही. तुम्ही आमची नीट काळजी घेत नाही. याचेच मला थोडे वाईट वाटते .बरेच दिवस विचार करत होतो की , कधीतरी तुमची कृती बदलेल आणि तुम्ही आमची काळजी घेणार परंतु अजिबात फरक पडलेला नाही तुमच्या वागण्यामध्ये . त्यामुळे आज मी तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी माझे मनोगत व्यक्त करत आहे.
आजपासून मनाशी पक्की खूणगाठ बांधून ठेवा की पुस्तकांची काळजी घेणार. पुस्तके जीवनाचा आधार आहेत हे विसरून चालणार नाही . त्यामुळे मी या निबंधामध्ये तुम्हाला जे सांगितले नीट लक्षात ठेवा मला येतो आता मी . माझे बोलणे पूर्ण शांततेने ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो .
.
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :
  • मी पुस्तक बोलत आहे। Mi Pustak Bolat Aahe
  • जीर्ण पुस्तकाचे मनोगत निबंध । Jirn Pustakache Manogat Essay 
  • पुस्तकाचे मनोगत निबंध । pustakache manogat essay
  • फाटक्या पुस्तकाची आत्मकथा

 

टीप :

1 ) जीर्ण पुस्तकाचे मनोगत निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

Leave a Comment