भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध । Bharatachya Simaresha Essay

भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध । Bharatachya Simaresha Essay

 

भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध । Bharatachya Simaresha Essay
भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध । Bharatachya Simaresha Essay

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध मराठी निबंध लेखन / Bharatachya Simaresha Essay 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत आत्मवृत्त निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण या विषया भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे  वर निबंध बघणार आहोत.

… 

भारताची सीमारेषा काहीशा तणावाखालीच युनोच्या कार्यालयात शिरली. चीन, पाकिस्तान. व बांगलादेश यांनी सीमारेषेजवळ हैदोस घातला होता. तिच्या तक्रारी ऐकून ऐकून शेवटी युनोने तिला तिचे गान्हाणे मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. पासपोर्ट, व्हिसा, अन्य कागदपत्रे यांची काटेकोर तपासणी झाल्यावर ती चौकशीकक्षात शिरली. तिच्या मनात संताप खदखदत होता. “मला खरोखरच अधिकार दिले, तर या तिन्ही देशांचा कायमचा बंदोबस्त करीन,” ती मनातल्या मनात म्हणाली. तिने समोर पाहिले. युनोच्या सेक्रेटरीसहित बरेच बड़े अधिकारी मोठ्या टेबलाच्या पलीकडे बसले होते. भारत, पाकिस्तान, चीन व बांगलादेश यांपैकी कोणाच्याच प्रतिनिधीला आज परवानगी नव्हती. भारतीय सीमारेषेला आपले गाऱ्हाणे मुक्तपणे मांडण्याची मुभा होती.

सीमारेषेचा चेहरा रागाने फुललेला होता. आतापर्यंत आवरून ठेवलेले संताप स्फोटक स्थितीला आलेला होता. तिने थेट मुयाला हात घालत बोलायला सुरुवात केली.

महोदय, चीन, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही नराधमांनी सीमेवर अक्षरश: रणकंदन माजवले आहे. हे तिघेती कूर व विश्वासघातकी आहेत. सततच्या कुरापती, कटकारस्थाने, हाणामाऱ्या, गोळीबार, हल्ले, रक्तपात यांनी माझ्या आसपासचा सर्व परिसर माखलेला असतो. मला एकही दिवस एकाही मिनिटाची उसंत मिळत नाही. यांच्या सततच्या कारवायांमुळे माझे डोकेच फिरून जाते. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अडसर नसता ना, तर या तिघांनाही माझ्या सीमेवरच्या वीजवाहक तारांनी आवळून यमाच्या घरी पाठवले असते.

“खरे पाहता. या सर्व प्रदेशात शांतता नांदावी; सर्वांनी गुण्यागोविंदाने राहून आपापली प्रगती करावी, कोणत्याही देशांमध्ये भांडणे होऊ नयेत म्हणून माझी निर्मिती झाली. पण या तिघांनाही शांतता नकोच आहे. भारत महासत्ता बनेल, ही चीनला भीती वाटते, भारतद्वेष हे पाकिस्तानचे एकमेव भांडवल आहे. पाकिस्तानातले राज्यकर्ते म्हणून आलेले अपयश लपवण्यासाठी व सुखाने सत्तेचा मलिदा खाता यावा, म्हणून पाकिस्तान सतत भारताच्या कुरापती काढते. बांगलादेश स्वतःच्या देशातली दरिद्री लोकसंख्या भारतामध्ये ओतून स्वतःच्या खांदयावरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

“हे काय चालले आहे? किती वर्षे सहन करायचे हे ? १९४७ सालापासून मी हे सहन करीत आलेय. चीन किती राक्षसासारखा वागतो, हे पाहायचे असेल, तर ले. कर्नल श्याम चव्हाणांचे ‘एका युद्धकैद्याची बखर’ हे आत्मकथन वाचा “चीन उघड उघड लष्करी हल्ले करीत असतो. खरे तर ते आक्रमण असते, परंतु युद्ध भडकल्यास दोन्ही देशांतली सामान्य जनता युद्धाच्या आगीत पोळेल, या भीतीने आम्ही नेहमीच समजुतीने घ्यायचा प्रयत्न करतो. पाकिस्तान तर अतिरेक्यांना घुसवून आमची अंतर्गत व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असते. बांगलादेश काही वेगळे करीत नाही. त्यांनी आसाम तर गिळंकृतच केला आहे.

“बरे, मला ओलांडून येणारे हे लोक केवळ पोट भरत राहिले असते, तरी चालले असते. पण यांना आमचा देश, त्याचा इतिहास, परंपरा यांविषयी काहीही सोयरसुतक नाही. जेवढ्या वाईट गोष्टी, तेवढ्या हे लोक करतात. आमची शांतता बिघडवून टाकतात. आदिमानवाच्या काळात लोक टोळ्यांनी राहत. दुसऱ्या टोळीतील माणसे दिसली रे दिसली की त्यांना मारायचे, अशी त्यांची रीत होती. हे तीनही देश टोळीच्या मनोवृत्तीतच अजूनही आहेत.

“आता आमचा संयम संपला आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय कायदयांचा वापर करून यावर काही तोडगा काढला नाही, तर आम्हाला आमचा मार्ग चोखाळावा लागेल. मग मात्र याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील.

जयहिंद ।

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

  • भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध मराठी 
  • भारताच्या सीमारेषेचे मनोगत 
  • भारताच्या सीमारेषेचे आत्मवृत्त
  • Bharatachya Simaresheche Garhane  

 

आमचे इतर निबंध पोस्ट : 

 

टीप :

1 ) भारताच्या सीमारेषेचे गाऱ्हाणे निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

Leave a Comment