संत गाडगेबाबांची माहिती। Sant Gadge Baba Information In Marathi

संत गाडगेबाबांची माहिती। Sant Gadge Baba Information In Marathi

 

संत गाडगेबाबांची माहिती

 

संत गाडगेबाबांची माहिती। Sant Gadge Baba Information In Marathi
संत गाडगेबाबांची माहिती। Sant Gadge Baba Information In Marathi

 

[wpdatatable id=25 table_view=regular]

 

एकदा विदर्भात दापुरा गावाजवळ पूर्णा नदीच्या परिसरात काही गुराखी मुले जेवणासाठी एकत्र आली होती. त्यांतही खालच्या जातीतील अस्पृश्य म्हणून काही मुलांना त्या सहभोजनातून बाजूला काढले होते. ती दलित मुले बाजूला बसली होती आणि व्यकोची मुले एकत्र वर्तुळाकार बसली होती. भोजनाला प्रारंभ होणार तेवढ्यात एक ‘डेबूजी’ नावाचा आठ वर्षांचा मुलगा उठला आणि त्याच मुलांबरोबर जेवेन अमा निर्धार जाहीर करून हा छोटा मुलगा त्या दलित मुलांजवळ गेला. त्याने त्यांच्यासमवेत जेवणा केले.

हाच डेबूजी म्हणजे पुढे लोकांनी गौरवलेला ‘ गाडगेबाबा ‘  त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली शेणगाव नावाच्या गावात धोब्याच्या घरात झाला, लहान वयातच त्याचे पितृछत्र हरपले आणि तो आपल्या मामाच्या आश्रयाखाली आला. मामाकडे राबत असतानाच डेबूजीने गरीबांवर, निर्धनांवर होणारे अत्याचार, त्यांची फसवणूक पाहिली, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या डेबूजीने स्वतःची पत्नी, आप्त व घर यांचा त्याग करून परिभ्रमणाचे व्रत स्वीकारले. फाटकेटके कपडे आणि एक गाडगे धारण करणारा, सतत लोकोपयोगी कामात गुंतलेला हा पुढे ‘ गाडगेबाबा ‘ म्हणून ओळखला जाऊ लागला.

गाडगेबाबांचे एक तत्व होते की, काम केल्याशिवाय काहीही कोठेही खायचे नाही. मग ते हातात एक खराटा घेत आणि आखले गाव झाडून काढत आणि लख्ख करून कत, मगच ते त्या गावात जेवण घेत. जेवण काय? तर डोक्यावरचे फुटके खापर भरून पातळ डाळ किंवा भाजी आणि ज्वारीची भाकरी. गावकऱ्यांनी याहून अधिक काही दिले तर से इतर गरिबांना वाटून टाकत.

गाडगेबाबा रोज पंधरा-पंधरा तास ज्ञानदान करत आणि तेही कसे तर गावातील अशिक्षित, कष्टकरी माणसांशी गप्पा मारत. त्यांना समाजातील थोतांड भोटूपणा यांबद्दल ‘विलक्षण चीड होती. देवाला नवस करणे वेडेपणाचे आहे असे ते सांगत, से म्हणत, “अरे, देव का साहेबाचा पट्टेवाला आहे का जी ? का वावरातील उलीशिक भाजी दिली, तर धावू धावू आपले काम करून टाकील ? अरे थी साहेबाचा साहेब आहे जानोबाने सांगितले, का आपापलं काम नेकीनं करत जावं, थो प्रसन्न होतो. ”

अशा सोप्या, साध्या शब्दांत गाडगेबाबा लोकांना शिकवत. बळी देणे हा प्रकार कसा चुकीचा आहे हे लोकांना सांगत. गाडगेबाबा लोकांना सांगत, “उत्तम जगण्याचं शिकवण्यासाठी कितीतरी शास्त्र रावत आहेत. आभाळावर पहाडावर, सागराच्या थैमानावर आपण मात केली. भुईच्या पोटात शिरलो. धन्य त्या शास्त्राची, विज्ञानाची. ”

गाडगेबाबा कधीही एका जागी राहत नसत. ते सतत फिरत. देवाने हे सुंदर पुस्तक म्हणजे जग तुमच्यासाठी लिहिले आहे, ते वाचत फिरावे. त्यांना खंत होती की, लोकशाही राज्य आलं तरीही आम्ही माणूस म्हणून जगायला शिकलो नाही आणि माणूस म्हणून दुसऱ्याला जगू दयायलाही शिकलो नाही.

 

संत गाडगेबाबांची माहिती
संत गाडगेबाबांचा पोशाख । Sant Gadage Baba Yancha Poshakh

गाडगेबाबांच्या डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ शर्ट असायचा. बाबांची शरीरयष्टी जाडजूड, धिप्पाड देह होता. नेसायला एक लुंगी. एका पायात कापडाचा बूट, तर दुसरा पाय अनवाणी असायचा. हातात एक काठी अन एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले; त्यांच्याजवळ नेहमी गाडगे असायचे म्हणून त्यांना लोक ‘गाडगे महाराज’ म्हणत असत.

 

संत गाडगेबाबांची माहिती। Sant Gadge Baba Information In Marathi
संत गाडगेबाबांची माहिती। Sant Gadge Baba Information In Marathi

 

संत गाडगे महाराजांचे कीर्तन | Sant Gadage Baba Yanche Kirtan 

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सग्यासोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगेसोयरे, सगळे विश्व हेच आपले घर,’ असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन-कीर्तन करत ते फिरू लागले.

 

संत गाडगेबाबा यांचे कार्य । Sant Gadagebaba Yanche Kary

स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि भूतदया यांवर गाडगे महाराजांचा विशेष भर असे. ते ज्या गावी कीर्तनासाठी जात तेथील सर्व परिसर स्वतः हातात झाडू घेऊन प्रथम स्वच्छ करीत असत. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा बाबत असणारे दोष दूर करण्यासाठी भजन, कीर्तन करून समाज प्रबोधन केले. गावोगावी फिरून सर्व गाव झाडून स्वच्छ केले.

 

संत गाडगेबाबा यांचे विचार | Thoughts of Sant Gadage Baba

 

दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.

दगडात देव नाही तर,देव माणसात आहे.

विद्या शिका आणि गरिबाले, विद्ये साठी मदत करा.

शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते, आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.

धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.

दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय, सुखाचे किरण दिसत नाही.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.

माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे, हाच बोध मी ग्रहण केला आहे.

 

संत गाडगेबाबा माहिती विडियो माध्यमातून । Sant Gadge Baba Information In Marathi 

 

Video Credit : Kids Knowledge Candy Youtube Channel

 

FAQ

Q.1) संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय होते ?

उत्तर : संत गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव डेबुजी झिंग्राजी जानोरकर हे होते.

 

Q.2) गाडगेबाबांचे शेवटचे कीर्तन कुठे झाले ?

उत्तर : पंढरपूर येथे 24 नोव्हेंबर 1956 ला गाडगेबाबांचे कीर्तन झाले.

Q.3) संत गाडगे बाबांचा संदेश काय होता ?

उत्तर : जोपर्यंत ते योग्य शिक्षण, स्वावलंबन आणि योग्य स्वच्छता अंगीकारत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होऊ शकत नाही.

..
वरील माहिती खालील विषयावर देखील लिहू शकता :
संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती मराठी । Sant Gadge Baba Full Information In Marathi
संत गाडगे बाबा यांचे जीवनचरित्र । Sant Gadge Baba Biography
एक थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा । A great social reformer Saint Gadge Baba
संत गाडगे बाबा निबंध । Sant Gadage Baba Essay In Marathi

 

आमचे इतर पोस्ट : 

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment