रंग नसते तर निबंध । Rang Nasate Tar Nibandh
मित्रानो , या पोस्ट मध्ये रंग नसते तर निबंध मराठी निबंध लेखन / Rang Nasate Tar Nibandh 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत कल्पनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण Rang Nasate Tar Nibandh या विषयावर निबंध बघणार आहोत.
…
चैत्र पाडवा झाला आणि कोकिळाचे कुहुकुहु कानामनात मधुर गुंजन करू लागले. त्याच वेळी मोगरा, जाईजुई, हिरवा, चाफा, पिवळा चाफा वगैरेंनी झाडांना विविध रंग बहाल करायला सुरुवात केली. आंब्याच्या हिरव्या पोपटी कोवळ्या पानांतून हिरव्यागार केन्या डोकावू लागल्या. बाहेर उन्हाच्या झळा हवेला तापवू लागल्या. तरीही बहाव्याचा गुलाबी व पिवळा, पामान्याचा लालबुंद गुलमोहराचा पिवळा लाल हे रंग रस्तोरस्ती फुलू लागले. म्हणूनच, याच काळात निसर्गाने माणसालाही रंगपंचमी खेळायला लावली.
शेकडो छटांचा साज लेऊन विविध रंग आपल्या मनात अलवारपणे उतरतात आणि मनाला आल्हाददायक तजेला देतात. बाहेर ऊन मी म्हणत असते. देहाची काहिली करते, पण हे रंग त्या काहिलीला मनापर्यंत पोहोचूच देत नाहीत. निसर्गाने माणसाला रंगांचे केवढे वैभव बहाल केले आहे! माणसाला केवढे समृद्ध केले आहे! हे सर्व रंगवैभव नसते तर…? तर माणूस दरिद्री झाला असता. रंगकंगाल झाला असता!
रोजच्या जगण्यात आपण या रंगयेभवात लोळत असतो. थोडेसे थांबून पाहा. विविध रंगांच्या हजारो छटा आपल्या कपड्यांवर नांदताना दिसतील. आपले जेवणाचे ताट डोळ्यांसमोर आणून पाहा. रंग सुखाने विसावलेले दिसतील, मी तर भाजीबाजारात जाण्याची संधी सोडतच नाही. मला बाजारात जायला आवडते म्हणून बाजारात आनंदाने जाते, बाजारातील से रंगांचे संमेलन मला मोहून टाकते हिरवा, लाल, पिवळा, निळा, जांभळा, नारिंगी वगैरे विविध रंग भाज्यांच्या विविध रूपांत तेथे विराजमान झालेले असतात. रंग नसतील आपले दैनंदिन जीवन रंगहीन आणि म्हणूनच कळाहीन बनेल.
जेथे रंग आहेत तेथे सौंदर्य असते कवी लेखक के सौंदर्याचे पुजारी आपल्या कथा कादंबऱ्यांतून किवा काव्यातून रंगांचे देव्हारे रचतात चित्रकार तर रंगांच्या दुनियेतच असतात. रंग नसते, तर सौंदर्याची ही दुनियाच नसती! रंगांची उधळण करणारे. होळी रंगपंचमी, दिवाळी, नवरात्र हे सणही नसते. कॉलेजात रंगांचा उत्सव मांडणारे साडी डे, रोझ डे ट्रेडिशनल डे वगैरे उत्सव नसते रंगाच्या निर्मितीत गुंतलेले लाखो कोट्यवधी लोक उपाशी राहिले असते.
रंग नसते तर सगळे जग एकतर काळे असते किंवा पांढरे असते. कल्पना करा, तुम्ही जेवायला बसला आहात. काळ्या ताटात काळा भात, त्यावर काळे वरण, काळी चपाती, काळी भाजी, चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड, मीठ, वही हे सर्व काळेच शेजारीच काळचा तांब्यात काळे पाणी! आपली शाळा काळीच असेल. वर्ग, वर्गातली बाके, फळा, खडू, डस्टर काळेच काळ्या खडूने काळ्या फळ्यावर लिहिल्यावर काय दिसेल ?
थोडे डोके वर करून बाहेर बघा. तेथे वृक्षवेली काळ्या, जमीन काळी, माती, दगड, धोंडे काळेच, बाजूने वाहणारी नदी काळी, पलीकडचा डोंगर काळा, आभाळ काळेच. आता कल्पना करा, प्रकाश कसा असेल ? बाप रे! काळा! समजा रात्रीची वेळ आहे. मिट्ट काळोख पडला आहे. म्हणून तुम्ही टॉर्च पेटवलात. त्यातून प्रकाशाचा झोत आला, तर तो काळाच असेल आता सांगा काही दिसेल का? पहाट झाली. थोड्याच वेळात डोंगराच्या आडून हळूहळू सूर्य वर येऊ लागला, तर हे दृश्य कसे दिसेल ? काळ्या डोंगराआडून काळा सूर्य वर येत आहे. सूर्याची काळी किरणे काळ्या पृथ्वीवर पसरत आहेत. वर्णन तरी करता येईल का ? काही दिसेल तरी का?
रंग नसतील तर सर्व विश्वच काळे असेल, प्रचंड काळ्या काळोखात आपण उभे. पायाखाली मुंग्या, विंचू, झुरळे, साप असले तर ते दिसणार नाहीत. शेजारी बाघ असेल तर कळणार नाही. चालू लागलो तर पुढे पाणी आहे, खड्डा आहे की दरी आहे, हे कळणारच नाही हे सोडाच, पण पिकवणार काय ? आणि खाणार काय ? छे, छे! रंग नसतील, तर जगणेच अशक्य आहे. काळ्याऐवजी पांढन्या रंगाचा असाच विचार केलात, तर हेच भीषण वास्तव समोर येईल.
खरंच, रंग नसतील तर माणूस नसेल ही पृथ्वी नसेल. हे विश्वच नसेल, रंग हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. पाणी म्हणजे जीवन, तसेच रंग म्हणजे जीवन!
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :
जगात रंग नसते तर निबंध । Jagat rang nasate tar essay
रंग नसते तर काय होईल । Rang nasate tar kay hoil essay
रंगाची किमया निबंध । Rangachi kimaya essay
आमच्या इतर निबंध पोस्ट :
- मला लॉटरी लागली तर निबंध
- नदी बोलू लागली तर निबंध
- दूरदर्शन नफा की नुकसान ? निबंध
- आम्ही संपावर जातो तेव्हा.. निबंध
टीप :
1 ) रंग नसते तर निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .
मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद.