Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

 

Ganpati Stotra in Marathi
Ganpati Stotra in Marathi

 

 

मित्रांनो आजच्या या आर्टिकल च्या  माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो.  म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Ganpati Stotra in Marathi  यास मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? तसेच गणपती स्तोत्र मराठी अर्थ व फायदे या पोस्ट ची संपूर्ण माहिती सांगणार आहोत चला तर मग पाहूया .

 

श्री गणपती स्तोत्र नारद पुराणात सांगितले आहे  नारद मुनि यांनी तयार केला आहे. व त्याचा अनुवाद हा श्रीधर स्वामी यांनी केला आहे.संकटनाशन म्हणजे सर्व संकटापासून मुक्त करणारे गणपती स्तोत्र.

गणपती स्तोत्र मराठी | Ganpati Stotra in Marathi

 

|| श्री गणपती स्तोत्र ||

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

।। इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण।।

 

 

 

गणपती स्तोत्र चा मराठीअर्थ I Ganapati Stotra Meaning in Marathi

 

नारद जी म्हणतात, गौरीपुत्र विनायकाला नमस्कार करतो आणि भक्तांसाठी इच्छा, आयु आणि अर्थ सिद्धी प्राप्तीसाठी गणेशाचे स्मरण करून हे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करत आहे.

गणपतीचे पहिले नाव वक्रतुंड (वाकलेला चेहरा असलेला), दुसरा एकदंत (एक दात असलेला), तिसरा कृष्ण पिंगाक्ष (काळा आणि तपकिरी डोळे असलेला), चौथा गजावक्र (हत्तीचा चेहरा).

गणपतीचे पाचवे नाव लंबोदर (मोठे पोट असलेला ) , सहावे विकट (दुर्बल ) , सातवे नाव विघ्र राजेंद्र आणि आठवे धूम्रवर्ण (राखाडी रंगाचा ) आहे.

नववे नाव भालचंद्र (ज्याच्या कपाळावर चंद्र सुशोभित झालाआहे ) , दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे गजानन आहे. गणपतीची बारा नावे देवासमोर म्हणेल त्याला कोणत्याही विघ्नाची भीती राहणार नाही आणि सर्व प्रकारच्या त्याच्या मनोकामना पूर्ण होतील.

जो विद्यार्थी असेल त्याला विद्या प्राप्त होईल. ज्याला धन हवे असेल त्याला धन प्राप्त होईल. ज्याला पुत्र हवा असेल त्याला पुत्र मिळेल आणि ज्याला मोक्ष हवा असेल त्याला मोक्ष मिळेल.

जो व्यक्ती गणपती स्तोत्राचा जप नियमित सहा महिने करेल त्याला अपेक्षित प्राप्ती होईल आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. जी व्यक्ती हा मंत्र पूर्ण लिहून लोकांच्या स्वाधीन करेल गणेशाच्या कृपेने त्याला सर्व विद्या प्राप्त होतील.

 

गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र ) – Sankat Nashan Ganpati Stotra

 

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्

भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्

तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:

न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्

संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय:॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम॥

 

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी
Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

 

गणपती स्तोत्र संस्कृत | Ganpati Stotra in Sanskrit

 |श्री गणपती स्तोत्र संस्कृत |

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।१।।

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

।। इति श्री गणपती स्तोत्रम् संपूर्णम् ।।

 

 

 

गणपती स्तोत्र चा जप कसा करावा

 

    • मंगळवारी गणेश स्तोत्र पठण करणे चांगले असते.
    • पूर्वेकडे चेहरा करून मांडी घालून बसावे.
    • पाण्याचा वापर करून जमिनीवर स्वस्तिक काढा, तांबेच्या ग्लास मध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यावर ठेवा.
    • तुम्ही गणेश स्तोत्र ५/७/११/१०८ अशे किती वेळा सुद्धा पठण करू शकता.
    • गणेश स्तोत्र पठण केल्यावरतांबेच्या ग्लास मधील पाणी तीर्थ म्हणून द्यावे, घरात शिंपडावे.

 

गणपती स्तोत्र जप का करावे

 

गणपती स्तोत्राला संकटनाशक स्तोत्र म्हटले जाते. गणपती देखील भक्तांची विघ्ने दूर करणारा विघ्णहर्ता आहे. त्यामुळे या स्तोत्रमचे पठण करून, एखादी व्यक्ती शेवटच्या काळापर्यंत त्यांच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकते असे म्हटले जाते.

 

गणपती स्तोत्र जप केल्याचा फायदा

 

गणपती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मन शांत राहते आणि वाईट गोष्टींना तुमच्या जीवनापासून लांब ठेवते.गणपती स्तोत्र पठण तुम्हाला निरोगी आणि समृद्ध बनवते.गणपती स्तोत्राचे पहाटेच्या वेळी पठण केल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होते.

 

 

अष्टविनायक :

महाराष्ट्रात अनेक लहान मोठी गणपती बाप्पा ची मंदिरे प्रसिद्ध आहेत तसेच बऱ्याच लोकाना गणपती बाप्पा चे दर्शन घेण्याची इच्छा असते परंतु अनेकांना अष्टविनायक दर्शनाची ठिकाणे माहीत नसतात म्हणूनच खालीलप्रमाणे तुमच्यासाठी लाडक्या गणपती बाप्पा ची महाराष्ट्रातीलअष्टविनायक स्थळे  :

                    1. मोरगांव -मोरेश्र्वर
                    2.  थेऊर – श्री चिंतामणी
                    3.  सिद्धटेक -श्री सिद्धिविनायक
                    4.  रांजणगाव -महा गणपती
                    5. ओझर – विघ्नेश्वर
                    6.  लेण्याद्री – श्री गिरिजात्मज
                    7.  महड -वरदविनायक
                    8.  पाली – श्री बल्लाळेश्वर

 

 

मराठी गणपती स्तोत्र विडिओ माध्यमातून :

Video Credit : Nova Marathi Bhakti Youtube Channel 

खालील माहितीसाठी हेच आर्टिकल पुन्हा वाचा :

संपूर्ण गणपती स्तोत्र मराठी [PDF] । ganpati stotra in marathi
गणपती (श्री गणेश) स्तोत्र – Ganpati Stotra Marathi
श्री गणपती स्तोत्र मराठी Ganpati Stotra Marathi Lyrics
गणपती स्तोत्र मराठी भावार्थसह

 

आमचे इतर काही  पोस्ट : 

Ram Raksha Stotra Benefits In Marathi | रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थ व फायदे

भारतीय संस्कृती मराठी महिती | Bharatiy Sanskruti In Marathi

शाहू महाराज माहिती मराठी । Shahu Maharaj Information In Marathi

Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male

एड्स मराठी माहिती। Aids Marathi Mahiti

Benefits of Ajwain in Marathi |ओव्याचे फायदे ,उपयोग व नुकसान

 

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

1 thought on “Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी”

Leave a Comment