Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male

Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male

 

Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male
Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male

 

 

नमस्कार, या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे  तुम्ही “Marathi Ukhane” शोधत आहात का? आम्ही तुमच्या साठी मराठीत काही  सुंदर “मराठी उखाणे” शोधले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहे .  म्हणजेच आजचा पोस्ट  च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला  Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सुंदर उखाणे देनार आहोत.

 

 

१५०+ मराठी उखाणे । स्त्रियांसाठी उखाणे। पुरुषांसाठी उखाणे

मराठी उखाणे

1. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

2.दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

3.देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

4. देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

5.देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची साराथी.

6.देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान.

7. दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती.

8.इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी..
__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.

 

9.बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून.

 

10.माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा…
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा.

 

11.सौभाग्यया चया प्रेमळ रुपी सागरात प्रेम रुपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करते…… बरोबर

12.नव्या प्रवासाच्या नव्या आशा, नव्या घरी पदार्पण,
…… च्या जीवनी माझे सर्वस्व अर्पण

13.टापटीप अरोग्याचे मूळ,
………… रावांसाठी सोडले माहेरचे मूळ…
सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

14.रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास

15.तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

16.हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

17.एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

18.सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून

19.काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

20.अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

21.सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

22.Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले.

23. आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
———- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.

24.तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
———- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.

25. घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
———- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे.

26.निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान,
गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान

27.शिडीवर शिडी बत्तीस शिडी
गणपत राव ओढतात विडी न मी लावते काडी

28.यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली…
__ आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली

29.लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
… तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

30.कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त…
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

31.छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

32.गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

33.सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
… रावांचे नांव घेते, …च्या घरात.

34.पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

Marathi Ukhane List

35.कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

36.हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

37.नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,

38.चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.

39.दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

40.मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

41.अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

42.गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

43.डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.

44.ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

45.कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

46.शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

47.श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

48.ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

49.यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,

50.अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,

51.लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

52.वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

53.घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

54.जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,

55.राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,

56.पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,

57.गृह कामाचे शिक्षण देते माता,
…रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

58.दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

59.पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

60चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

 

Marathi Ukhane For Female । स्त्रियांसाठी उखाणे मराठी 

 

Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male
Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male

 

1.आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……….. रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

2.गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
…….. रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.

3.उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

4.आईचे वळण, वडिलांचे शिक्षण,
……… राव पती मिळाले हेच माझे भूषण

5.जडतो तो जीव, लागते ती आस,
…….. रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.

6.गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,
……… रावांच्या संसारात आहे मी दंग.

7.असंख्य तारे, नभात पहावे निरखून,
……….रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.

8.आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

9.चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.

10.लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
…………रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

11.नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

12.सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
…….. चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

13.हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

14.माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

15.वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड,
……… रावांच्या जीवनाला माझी जोड

16.आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास,
……..नाव घेते तुमच्यासाठी खास.

17.दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
………..राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

18.कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर,
…………. च्या मदतीवर, सगळा माझा जोर.

19.शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.

20.सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
……..रावांच्या मांडीवर घेते झोप.

21.सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ

22.लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर ………… रावांशी बांधली, लग्नाची गाठ.

23.संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

24.संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
………..रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

25.मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
…….. रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

26.आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,

…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश..!!

27.नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,

…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी..!!

28.भोळ्या शंकराला बेलाची आवड,

….. रावांची पती म्हणून केली मी निवड..!!

29.यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,

….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब..!!

30.रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,

…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास..!!

 

Marriage Ukhane Marathi

 

31.रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,

….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा..!!

32.स्त्रियांसाठी मराठी उखाणे

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,

33.रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी..!!

एक तीळ सातजण खाई,

34.सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,

राव मला मिळाले आहेत ते अनुरूप..!!

35.गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,

…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती..!!

36.फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती
-__रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती..!!

37.सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
__रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात..!!!

38.माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
__रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी..!!

39.शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
__रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले..!!

40.जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
__रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने..!!

41. देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,
खूप खुश आहे आज मी, कारण ______ सोबत माझे लग्न जुळाले.

42.जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,
_____ आणि _______ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.

44. मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद,

_______ रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.

45.चंद्र तारागणाच्या मेळाव्यात रजनी हसते,

………… बरोबर तोडे घेऊन बारशाला येते

आंब्यांच्या फांदीवर पाय कसा देऊ,
………… बरोबर ………. घेऊन बारशाला येऊ.

सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
……….. बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.

46.पतिव्रता धर्म नम्रतेने वागते,
……… बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विनयाने विद्या शोभते,
……..बरोबर……..घेऊन बारशाला येते.

तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला नवस करते,
……… बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

सकाळच्या वेळी अंगणात येतात काऊ, चिऊ,
………बरोबर………घेऊन बारशाला येऊ.

टीप :- पहिल्या……..ठिकाणी पतीचे नाव घेऊन
दुसऱ्या……… ठिकाणी दागिन्याचे नाव घ्यावे.

47.इंडिया इज माय कंट्री
ऑल इंडियन आर
माय ब्रदर अँड सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.

48.ग्रास इज ग्रीन, माय मिस्टर,
……. इज व्हेरी फाइन.

49.क्रिकेट इज ब्यूटीफूल गेम,
……….. इज माय मिस्टर्स नेम.

50.श्रावण महिन्यात सण, उत्सवाची पर्वणी
………चं नाव घेते मी वाती सारण्याचा कारणी.

 

Marathi Ukhane For male । पुरुषांसाठी उखाणे मराठी 

 

Ukhane Marathi। Marathi Ukhane For Male
Ukhane Marathi। Marathi Ukhane For Male

 

 

1.नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून.. नुकताच सचीन आलाय

सेंचुरी टाकून…आन् …….रावांचं नाव घेते #चार गडी राखून.

 

2.हरे हरे भिंत पे बैठी एक पाल हरे हरे भिंत पे बैठी

एक पाल ईकबाल मेरा टकल्या, उसके सर पे नही बाल.

 

3.बागेत बाग राणीचा बाग… बागेत बाग #राणीचा बाग…

अन् रावांचा #राग म्हणजे धगधगणारी आग.

 

4.Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले,………

आहे खरच बिनकामी हे लग्न झाल्या कळले.

 

5.ऍश्वर्याअभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी, ईशा देओल

उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात.

 

6.हा दिवस आहे आमच्या करिता खास,
_ ला देतो गुलाब जामुन चा घास.

 

7. _च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,

_ ला पाहून, पडली माझी विकेट.

 

8.कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास

_ ला देतो मी श्रीखंडाचा घास.

 

9. भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,_______

ची आणि माझी, लाखात एक जोडी.

 

10.ष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी,______

ला ठेविन, आयुष्यभर सुखी.

11.माझ्याशी लग्न करायला ______ झाली राजी,

केल मी लग्न, _________ झाली माझी.

12.खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,______

माझी, सगळ्यात देखणी.

13.गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात.

 

14.चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा.

 

15.चंद्र आहे चांदणीच्या संगती
आणि ….. आहे माझी जीवनसाथी.

 

16.चंद्राला पाहून भरती येते सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला.

 

17.जाईच्या वेलीला आलाय बहार,
…..ला घालतो २७ मे ला हार.

 

18.जाईजुईचा वेल पसरला दाट
…बरोबर बांधली जिवनाची गाठ.

 

19.जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
….. च्या सहवासात झालो मी धुंद.

 

20.जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा.

Marathi Ukhane For Wife

 

21.झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.

 

22.तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

 

23.ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

 

24.दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग.

 

25.दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा.

 

26.दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

 

27.दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

 

28.देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

 

29.देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

 

30.देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची साराथी.

 

31.देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान.

 

32.देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
…. मुळे झाले संसाराचे नंदन.

 

33.दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

 

34.दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती .

 

35.हा दिवस आहे आमच्या करिता खास,
…..ला देतो गुलाब जामुन चा घास.

 

36.अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

 

37.अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

 

38.आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

 

39.काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

 

40.कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास

….. ला देतो मी लाडवाचा घास.

 

Ukhane Marathi। मराठी उखाणे विडियो माध्यमातुन 

Video Credit: बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane Youtube Channel

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :

 

Marathi Ukhane For Haldi Kunku
Ukhane For Male & Female 2023
Marathi Ukhane for Male
Marathi Special Ukhane
New Marathi Ukhane।Marathi Ukhane
Marathi Ukhane List

 

आमचे इतर काही  पोस्ट : 

 

Widal Test Meaning In Marathi । विडाल टेस्ट म्हणजे काय ?

Sapiosexual Meaning In Marathi। सेपिओसेक्सुअल म्हणजे काय ?

Omnivores Meaning In Marathi। सर्वभक्षी म्हणजे काय ?

Spam Meaning In Marathi । स्पॅम म्हणजे काय ? 

Debug Meaning in Marathi । डीबग म्हणजे काय ?

एड्स मराठी माहिती। Aids Marathi Mahiti

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

1 thought on “Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male”

Leave a Comment