Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध

 

Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध

 

Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध  
Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध

 

 

 

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये व्यायामाचे महत्व निबंध| Importance of Exercise In Marathi मराठी निबंध लेखन / व्यायामाचे महत्व निबंध 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत  वैचारिक निबंध  म्हणून विचारला  जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण व्यायामाचे महत्व निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत.

 

|| व्यायाम आरोग्यदायी मित्र ध्यानी ठेवावे हे सूत्र ||
||आळस वैरी मानिला सर्वत्र |सर्वतोपरी ||

 

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारखे सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे . हे सुत्र आपण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे , व्यायामामुळे आपल्या शरीरात अनेक चांगले आणि सकारात्मक बदल होतात. त्याचप्रमाणे व्यायामाअभावी खुपसे दुष्परिणामही सहन करावे लागतात.

कोणाच्याही घरात असे घडले असते, तर कोणीही हादरलाच असता, आमच्या गावातल्या एका मुलीच्या असेच झाले. तिच्या घरचे लोक तर हादरलेच, पण गावातले लोकही खूप हळहळले, तिचे नाव सुमन, अत्यंत मान गावालाच तिचे खूप कौतुक. स्वतः च्या हुशारीच्या बळावर तिला मुंबईच्या वैद्यकीय महाविदयालयात प्रवेश मिळाल पण जवळजवळ एका महिन्यांनंतर एकदा ती जी घरी आली, ती पुन्हा महाविदयालयात न जाण्याच्या निश्चयानेच

सगळ्यांना धक्काच बसला. वैदयकीय शाखेत तासन्तास सलग अभ्यास करावा लागतो. कित्येकदा प्रयोगशा तासन्तास उभे राहून काम करावे लागते. तिच्या शरीराला हा ताण झेपेना. काही वेळा तिला चक्कर यायची. आयुष्यात भरारी घ्यायच्या वेळीच तिची शारीरिक क्षमताच अपुरी ठरली. केवढे दुर्दैव है! सर्व काही अनुकूल असूनही केवळ शारीरिक क्षमता अपुरी पडल्याने आयुष्यातली फार मोठी संधी हुकली! शरीर धडधाकट नसणे किती महागात पडले पाहा! या घटनेनंतर आमच्या जिल्हयातल्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘शरीर धडधाकट ठेवा’, ‘व्यायाम करा’ अशा संदेशांचा धडाका सुरू झाला. खास व्याख्याने आयोजित केली जाऊ लागली. आम्हां मुलांमध्येही व्यायामाबाबत चर्चा झडू लागल्या.

व्यायाम ही खरे तर अतिमहत्त्वाची व अत्यावश्यक बाब; पण तीच सर्वांची नावडती झालीय. आपले शरीर भोवतालच्या वातावरणात वावरत असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत असते, वातावरणातील अब्जावधी सूक्ष्म जंतू शरीरावर आदळत असतात; शरीरात शिरतही असतात. त्यातही पुन्हा आजारपण येते. अपघात होतात. या सगळ्याला तो देऊन टिकून राहण्यासाठी शरीर दणकट असणे आवश्यक असते. प्रदूषणाचाही शरीरावर आघात होत असतोच, आपल्याला कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त दूरवर प्रवास करावा लागतो. कित्येकांना रोज खूप चालावे लागते. ओझी उचलावी लागतात. काहींना जागरणे करावी लागतात. या सगळ्यामुळे शरीराला कष्ट पडतात. हे कष्ट समर्थपणे उचलण्यासाठी शरीर ताकदवान हवे. शरीर जितके बळकट तितके ते परिस्थितीला चांगले लॉड देऊ शकते. आपण प्रतिकूलतेवर मात केली, तर आपली कामे यशस्वीरीत्या पार पाडता येतील. आपल्याला आनंदाने जगता येईल. व्यायामानेच आपण शरीराला बळकट करू शकतो, म्हणजेच व्यायाम हा आपल्या सुखाचा आधार आहे.

अपघात, आजार, दारिद्र्य, प्रदूषण, उतारवय किंवा आपल्या सवयी अशा वेगवेगळ्या कारणांनी आपले शरीर दुबळे बनते. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेचा नाश होतो. व्यक्तीकडून कमी काम केले जाते. साहजिकच तिचे उत्पन्न बुडते. तिच नुकसान होते. तिच्याबरोबर राष्ट्राचेही नुकसान होते. उत्पन्न कमी झाल्यामुळे आहार, आरोग्य ढासळते. त्यामुळे शरीर आणखी दुबळे बनते. कार्यक्षमता कमी होते. म्हणून उत्पन्न कमी होते. असे हे दुष्टचक्र चालू होते आणि फक्त दुःखच वाट्याला येते.

ही दुबळी माणसे आपलीच असतात. त्यांना आपण दूर ढकलू शकत नाही. त्यांचा सांभाळ करावाच लागतो. देश अशांच्या पालनपोषणाची सोय करतो. हॉस्पिटले, दवाखाने आदींची निर्मिती करतो. म्हणजे उत्पादन कमी व खर्च जास्त अशी वेळ येते. हे टाळण्यासाठी सगळ्यांनी स्वतःचे शरीर धडधाकट ठेवले पाहिजे. व्यायाम केला पाहिजे.

पूर्वीची जीवनपद्धत वेगळी होती. पूर्वी यांत्रिकीकरण नव्हते किंवा असलेच तर खूपच कमी होते. सर्व कामे श्रमावर आधारलेली होती. अनेकदा लहानसहान कामेही दूर दूर चालत जाऊन करावी लागत. कोणतेही काम कष्टाशिवाय करणे शक्य नसे. त्यामुळे शरीर आपोआपच बळकट राही. आता उलट स्थिती आहे. आता खूप साधने, उपकरणे उपलब्ध आहेत. अनेक कामे या उपकरणांनीच पार पाडतात. त्यामुळे खूपच कमी श्रम खर्च करावे लागतात. सुबत्ता आली आहे; पण शारीरिक कष्ट कमी झाले. म्हणून शरीर धडधाकट राहिलेले नाही. त्यामुळे जीवनातला आनंदही सहजगत्या उपभोगता येत नाही.

आनंद उपभोगण्यासाठी कृत्रिमता आली आहे. सुबत्ता आहे, पण सुखे नाहीत अशी लक्षणविचित्र प्राप्त झाली आहे यातून बाहेर पडण्यासाठी शरीर धडधाकट हवे व्यायाम केला पाहिजे.

दुबळ्या शरीरामुळे जीवनातील आनंद उपभोगता येत नाही, मन थकलेले राहते दिवसच्या दिवसा मनात नैराश्य दाटून येते, उत्साह कमी होतो. आनंद घेण्यातही उत्साह राहत नाही संपूर्ण आयुष्यच निराशाजनक कंटाळवाणे बनून जाते. ही स्थिती भयानक असते म्हणून शरीर सुद्ध हवे शरीर सुदृढ ठेवण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे व्यायाम होय.

 

 

Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध
Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध

 

 

व्यायामाचे महत्व आणि फायदे 

 

व्यायामाचे महत्व :

व्यायामाचे जीवनातील महत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध प्रकारे व्यायाम आपल्या शरीरसाठी चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो . व्यायाम केल्याने आपल्याला भरपूर फायदा होतो .विविध समाज सुधारक आणि विविध विचारवंतांनी आपल्या विचारातून समाजाला व्यायामाचे जीवनातील महत्त्व पटवून देण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे. आपल्या विचारांमध्ये व्यायामाचे महत्व पटवून देत त्यांनी सांगितले आहे की आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, व व्यायाम हा तुमचे संरक्षण करणारा व तुमच्या आयुष्य वाढवणारा मित्र आहे.

शारीरिक स्वास्थ्य :  व्यायाम शारीरिक स्वास्थ्याच्या महत्त्वाच्या अंशामध्ये एक आहे. योग्य व्यायाम केल्यास, तुमचे दिल, प्रक्षिपाती प्रणाली, तंतुजनन शक्ती, अस्थिपाचन प्रणाली, आणि सार्वजनिक शारीरिक सामर्थ्य मजबूत होते.

मानसिक स्वास्थ्य :  व्यायाम मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. नियमित व्यायाम करण्यातून तुमच्या आत्मविश्वासाचा वाढ झाला आणि तुमच्या मानसिक स्थितीला सुधारलं.

वजन प्रबंधन :  व्यायाम वजन प्रबंधनासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही वजन कमी किंवा वाढीवर नियंत्रण ठेवू शकता.

स्थैर्य :  नियमित व्यायामाच्या कार्यक्रमाच्या अभ्यासाच्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थैर्याची वाढ देऊ शकता.

रोग नियंत्रण :  व्यायामाच्या कार्यक्रमाच्या अभ्यासाच्या माध्यमातून, तुम्ही काही गंभीर आजारांच्या जोखमात घेऊ शकता. तुम्ही मधुमेह, हार्ट रोग, उच्च रक्तदाब, आणि अनेक इतर स्वास्थ्य समस्यांच्या जोखमात घेऊ शकता.

जीवनशैली  :नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला स्वस्थ, ऊर्जावान, आणि सशक्त जीवनशैली जगायला मदतीला आहे.

सामाजिक संबंध :  व्यायाम केल्यास, तुम्ही सामाजिक संबंधांमध्ये सहभागी व्हायला मदतीला आहे. तुमच्या फिटनेस अभ्यासाने तुमच्या साथींच्या आणि कुटुंबाच्या सदस्यांच्या साथीत्याने आणि आवश्यकतांमुळे सहभागिता वाढविली जाते.

 

व्यायामाचे फायदे :

 

व्यायामाचे अनेक असे फायदे आहेत , जर आपण सकाळी उठून लवकर बाहेर फिरायला गेलो तर आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.याव्यतिरिक्त पायी चालल्यामुळे आपल्या क्षेत्रातील रक्ताभिसरण योग्य रीतीने होते व पायातील मांसपेशी अधिक बळकट होते.

त्यामुळे मानवाचे शरीर अधिक बळकट बनते आणि लवचिक सुद्धा बनते नियमित व्यायामामुळे  मानवाचा मेरुदंड अधिक लवचिक होतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण होते.

व्यायामाचे पुष्कळसे प्रकार आहे यामध्ये चालणे फिरणे योगासने, मोठ्याने असणे नाचणे, जिम करणे इत्यादी प्रकार असतात.व्यायामाचे प्रकारांमध्ये सर्वोत्तम आसान सूर्यनमस्कार आहे.या एका व्यायामामुळे आपल्या प्रत्येक अवयवाची योग्य रीतीने हालचाल होते.

अशा प्रकारे व्यायामाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.जगामध्ये व्यायामाची जनजागृती होण्याकरिता आणि व्यायामाचे फायदे अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचवण्या करिता 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

जगामधील मानवाजवळील सर्वात मौल्यवान अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे त्याचे आरोग्य होय. म्हणून इंग्रजी मध्ये Health is wealth म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे  ही प्रसिद्ध म्हण आहे.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जगामध्ये प्रत्येकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतातच.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकांना व्यायाम हा उपाय सांगितला जातो. भारतामध्ये व्यायामाला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्व आहे.सकाळी सर्व जण ऋषीमुनी आपल्या कुटीमध्ये आणि विद्यार्थी आपल्या गुरुंच्या आश्रमात जाऊन नियमित व्यायाम करीत असे, म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या किंवा रोग होत नसे.

 

 

व्यायामाचे महत्व निबंध विडिओ माध्यमातून 

 

Video Credit : पथिक  Youtube Channel

 

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता 

व्यायामाचे महत्व आणि फायदे | Vyayamache Mahatva ani Fayade
व्यायामाचे महत्व मराठी निबंध | Vyayamache Mahatva Marathi Nibandh 
व्यायामाचे महत्व निबंध |Importance of Exercise In Marathi

 

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi

परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 

मी आमदार झालो तर निबंध। Mi Amadar Jhalo Tar Essay in Marathi

माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध

 

 

टीप :

1 ) व्यायामाचे महत्व निबंध  हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

1 thought on “Importance of Exercise In Marathi | व्यायामाचे महत्व निबंध”

Leave a Comment