Veleche Mahatva Essay in Marathi | वेळेचे महत्व निबंध मराठी
मित्रानो , या पोस्ट मध्ये वेळेचे महत्व निबंध मराठी निबंध लेखन / Veleche Mahatva Essay 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण Veleche Mahatva Essay in Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.
वेळेचे महत्व निबंध 100 शब्दात । Veleche Mahatva Essay 100 world
वेळेचे महत्व १०० ओळी मराठी निबंध
वेळ ही काय वस्तू आहे यांचे वास्तविक ज्ञान होणें मोठमोठ्या पंडितांसही दुर्घट आहे मग आह्मांसारख्याची कथा ती काय? इंग्दातील नसद्ध तत्ववेत्यादिकांनी व आमच्या प्राचीन वैदिक ऋषींनी गढ उकलण्याबद्दल फार खटपट केली, परंतु वेळ ही आदि अंतरहिन एक वस्तू आहे ह्या खेरीज त्यांना काहीही माहिती मिळाली नाहीं व हर्बर्ट स्पेन्सर तर हे गूढ कधीही उकलणार नाही अ ह्मणतो. यावरून वेळेविषयीं विचार करणें मानव शकीच्या बाहेर आहे हे उघड आहे.
वेळ ही अनादिसिद्ध कांहीही वस्तू असली तरी ती आपल्यास फार उपयोगी आहे हे खरे आहे. वेळ ही मनुष्य प्राण्याच्या उत्पत्ती पूर्वी- अगणित काळापूर्वी होती व पुढेही अनंत वर्षेपर्यंत असणार. परंतु आह्माला त्या सर्व वेळेशी काही करावयाचें नाहीं. आमच्या आयुष्या- तील जी वेळ त्या वेळचा सद्वयय केला ह्मणजे झालें.
ममुप्या दिवसांम करावे व रात्री विश्रांती घ्यावी एतदर्थ दिवस व रात्र ईश्वराने निर्माण करून मनुष्याध्या उपयोगाकरितां वेळेचे आयतेच विभाग पाहिले आहेत.
वा दिवमध्ये कामाच्या सोई करितां मनुष्यानें तास, टिकापळे असे विभाग पाडविले आहेत. याचा उपयोग आपल्या आयुष्यांतील किती काळ गेला है सम जुन येऊन व गेलेला काळ पुन्हां परत येत नाहीं यार्चे ज्ञान करून देण्यास होतो.
मनुष्या अयुष्य अगोदर शंभर वर्षे आहे. आतां प्रत्येक मनुष्य शंभर वर्षे वांचतो असा नियम नाही. ह्या शंभर वर्षातील पन्नास वर्षे झोपेत जातात व बाकीची बाळपणाच्या खेळांत, तरुणपणाच्या धुंदीत, अथवा याता पणच्या व्याधीत जाऊन वेळ फुकट दवडल्यासारखे होते व आपल्या मायुष्याचे सार्थक न होता ते फुकट घालव ल्यासारखं होतें. याकरिता प्रत्येक मनुष्याने आपल्याला समजूं लागल्यापासून एक क्षणाचाही अपव्यय न करिता जेणेकरून आपले स्वतःचे एकंदर जगाचे कल्याण होईल त्या गाष्टीमध्ये आपल्या वेळेचा व्यय करावा है उत्तम होय,
आपले आयुष्य पाण्यावरील बुडबुड्या प्रमाणे क्षणभं गुर आहे. व आपण आळशी राहिली ह्मणून वेळ काहीं आपल्या साठी थावून रहात नाही. ती एकसारखी मराम्या मनि पढेंच धांव मारणार. एक पळही जर का गेले तर ते पुन्हा आपल्यास लाभणार नाहीं असे आपल्या आयुष्यातील वेळेचे महत्व आहे एकवेळ मृत माणून परत येईल; परंतु वेळ परत यावयाची नाही.
की मुले आपल्या लहानपणच्या अमोलिक वेळेचा अपव्यय करून अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करितात त्यांना मोठे- पण फार हाल भोगावे लागतात.
लहानपण मनास कोणतीही काळजी नसल्यामुळे अभ्यास जमा उत्तम होतो तमा तो मोठेपण होत नाही. याकरितां प्रत्येक मनुष्याने आपले आयुष्यांतील मौल्यवान् वेळेचा सद्व्यय केला असतां त्याच निरंतर कल्याण होईल.
भ्वः कार्यमद्यकुर्वीत पूर्वाहे चापराण्डिकम् ॥
नहि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य नत्राकृतम् ॥ १ ॥
समाप्त
वेळेचे महत्व निबंध मराठी 300 शब्दात
Veleche Mahatva Essay in Marathi 300 World
वेळेला खूप महत्त्व आहे प्राचीन काळापासून अनेक ज्येष्ठ लोक सांगत आहेत की वेळेला खूप महत्त्व आहे आणि ग्रंथात तसेच आपल्या धर्मग्रंथात सुद्धा वेळेला महत्त्व दिले आहे . श्रीकृष्ण यांनीसुद्धा वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे आपल्या जीवनातून जाईल ती पुन्हा कधीही माघारी किंवा कितीही किंमत मोजली तर माघारी येत नाही . त्यामुळे वेळेचा सदुपयोग आणि बचत केली पाहिजे. वेळ अशी गोष्ट आहे जी कधीही माघारी येणार नाही आणि पैसे देऊन विकत घेता येत नाही .
वेळे सारखे मौल्यवान असे काहीच नाही . वेळेचा फक्त आपण वापर करू शकतो. वेळेला थांबवता सुद्धा येत नाही किंवा त्याला खरेदी किंवा त्याला विकता सुद्धा येत नाही . जे भूतकाळात आपल्या सोबत घडली आहे त्यापासून शहाणपण घेऊन आपण आपले भविष्य घडविले पाहिजे. जे लोक वेळी फक्त टाईमपास करुन वेळ वाया घालवतील त्यांचे भविष्य है अंधकारमय होते .
जे लोक अशा प्रकारे आपले अमुल्य वेळ वाया घालवतात त्यांना त्यांचा पश्चाताप भविष्यामध्ये होतो . आपला वेळ वाया घालवला याचा त्यांना पश्चाताप होतो . आपण आपला वेळा व आपल्या प्रगती साठी वापरला पाहिजे. पुस्तके वाचून किंवा ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आपण आपल्या वेळेचा उपयोग केला पाहिजे .
जी मुले आपल्या शैक्षणिक जीवनात वेळ वाया घालवतात त्यांचे करिअर किंवा भविष्य असे घडत नाही. त्यामुळे मुलांनी आपल्या वेळेचा वापर अभ्यास करण्यासाठी तसेच नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी वापरावा . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपला वेळ वाचवण्यासाठी किंवा जेवणासाठी वेळ वाया जाऊ नये म्हणून ग्रंथालयात पाव खाऊन आपला वेळ अभ्यासासाठी वापरायचे .
जी मुले आयुष्यामध्ये यशस्वी होतात त्यांनी आपला मोकळा वेळ सुद्धा चांगल्या कामासाठी व्यतीत केला आणि आपली प्रगती साधली असे दिसून येईल . हिंदी मध्ये एक म्हण आहे समय और ज्वार भाटा किसी के लिये नहीं रुकती याचा अर्थ असा की वेळ कोणासाठी थांबत नाही .
वेळ सारखी स्वस्त असे काहीच नाही आणि वेळ सारख्या मौल्यवान असे काहीच नाही . वेळेला जगात ताकदवर समजले जाते . वेळ हि खूप ताकदवान असते त्यांच्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात अगदी देव सुद्धा. वेळेला बलशाली म्हणतात एक क्षण सुद्धा खूप महत्त्वाचा असतो जो आपल्या मृत्यूशय्येवर असतो आणि डॉक्टर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत असतात त्यांना एक क्षण महत्वाचा वाटतो .
आपल्या आयुष्यातली अनेक महत्वाची वेळ येतात त्यासाठी आपण सातत्याने मेहनत घेतली पाहिजे, जर आपण आपला वेळ वाया घालवला तर आपणास यश मिळणार नाही. वेळेला कोणतेही अंत्य नाही तसे वेळे ला सुरुवात नाही . तो त्याच्या गतीने चालतो ,वेळेला थांबवता येत नाही आणि वेळ गतिमान करता येत नाही. वेळेला कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही .
बरेचशे लोक निराश होतात आणि आपले धर्य संपून आपला वेळ वाया घालवतात आणि अपयशी होतात . त्यामुळे वेळेचे महत्व नेहमीच ओळखले पाहिजे.
वेळेचे नियोजन कसे कराल। वेळेचे महत्त्व । Time Importance
१. ध्येय सेट करा.
जसे आपण आयुष्याचे ध्येय सेट करतो. तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचे आणि कामाचे ध्येय सेट करणे गरजेचे आहे. आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करायचे असल्यास आपण योग्य पद्धतीने वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. कि मला इतक्या वेळेत एवढे काम पूर्ण करायचे आहे आणि ते त्यावेळेत पूर्ण झाले पाहिजे. असे केल्याने तुम्हला सर्व गोष्टी वेळेत करण्याची सवय लागेल. आणि कमी वेळेत जास्त काम होऊ शकते.
२. कामाचे प्लांनिंग करा.
आपल्या दैनंदिन जीवनात काही महत्त्वाची कामे असतात त्याचे प्लांनिंग एक दिवस आधी करा. एखादे मोठे काम असेल तर त्याचे दोंन भागामध्ये विभाजन करा. आणि ठरवलेल्या प्लांनिंग प्रमाणे ते पूर्ण करा. आधीच प्लांनिंग केल्यामुळे आपला बराच वेळ वाचतो आणि जर आधीच जर आपले प्लांनिंग नसेल तर आपला विचार करण्यात वेळ जातो आणि पुढे उशीर होतो.
३. कामाची टाळाटाळ करणे बंद करा.
आपल्यापैकी काही लोक असे आहेत कि आजचे काम उद्या करू उद्याचे काम परवा करू आणि तो दिवस आला कि परत तेच तेच करणं यामुळे वेळ खूप वाया जातो. जी कामे खूप लहान लहान असतात तरी सुद्धा त्याची टाळाटाळ केली जाते. हि सवय बंद करा. असे केल्यानी जी तुमची महत्तवाची कामे असतात ती करण्यासाठी ऊर्जा राहत नाही. म्हणून Time Importance समजून घेणे खूप गरजेचे आहे.
४. एका वेळी एकाच काम करा.
एखाद आपण एकाचवेळी एकाच काम करत असतो तेव्हा आपण पूर्ण एकाग्रता लावून ते काम करतो म्हणून ते काम आपण आधी प्रभावीपाने आणि यशस्वी पद्धतीने वेळेच्या आधी पूर्ण करतो. पण जर आपण एकाच वेळी अनेक कामे एकत्र करत असू तर आपली ऊर्जा काम पडते. आणि ती विभागली जाते त्यामुळे कोणतेच काम पूर्ण होत नाही.म्हणून आपण एकाच कामात १००% ऊर्जा लावून काम केले तर ते वेळेत पार पडते.
५. ८०% आणि २०% असा नियम पाळा.
आपल्या जेवणातील प्रत्येक दिवसात म्हणजेच आपल्या आयुष्यात दोन प्रकाची कामे असतात. एक म्हणजे रोज ऑफिस ला जाणे दिवसभर तिथे काम करणे किंवा वर्क फ्रॉम होम करणे अशी महत्त्वाची कामे ८०% मध्ये येतात. ज्या कामाने आपली प्रगती होते आणि आपला फायदा होतो. आणि दोन म्हणजे tv बघणे , फोन बघणे ,गेम खेळणे ,चाटटींग करणे हि कामे आपल्या आयुष्यात २०% येत असतात. कारण अश्या कामांमधून आपल्याला कोणताही फायदा किंवा आपली प्रगती होत नाही.फक्त आपला वेळ वाया जातो.
६. कामाचा ABCDE फॉर्मुला ठरवा.
आपल्या आयुष्यात चार खूप महत्तवाची कामे असतात. ती चा भागामध्ये असतात.
A – जी आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची असतात.
B – जी कामे महत्त्वाची आहे पण ती नाही झाली तरी आपल्या ध्येयावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
C – जी कामे आपण केली तरी ठीक आहे आणि नाही केली तरी ठीक आहे.
D – जी कामे आपण स्वतः ना करता दुसर्याकडून करून घेणे.
E – जी कामे कधीच महत्तत्वची नसतात.
आपल्या कामाचा फॉर्मुला असा ठेवल्यामुळे आपली महत्त्वाची कामे लवकर मार्गी लागतात. आणि त्यांना लागणार तिने पण कमी लागतो. वेळेत पार पडतात.
७. सेल्फ डिसीप्लेन
आपल्याला आपल्या वेळेच्या महत्व कळण्यासाठी स्वतःलाच आपण डिसीप्लेन लावले पाहिजे. त्यामुळे आपले ध्येय कितीही मोठे असले तरी ते कमीत कमी वेळेत पूर्ण करू शकतो. रोजची कामे किंवा आपली कधी तरी असणारी महत्तवाची कामे स्वयंशिस्त लावल्यामुळे वेळेत पूर्ण होतील. तसेच स्वयंशिस्त लागल्याने अचानक काही कामे आली तरी ती आपण यशस्वीरीत्या वेळेत पूर्ण करू शकतो.
वेळेचे महत्व निबंध मराठी विडियो माध्यमातून
video credit :Vishay Mahiti youtube channel
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :
Veleche Mahatva Essay in Marathi | वेळेचे महत्व निबंध मराठी
मराठी निबंध वेळेचे महत्व
वेळेचे महत्व १०० ओळी मराठी निबंध
वेळेचे महत्व मराठी निबंध 2023
आमचे इतर निबंध पोस्ट :
टीप :
1 ) वेळेचे महत्व निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .
मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद.