Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३ 

Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३ 

Contents hide
1 Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३

 

 

Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३ 
Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३

 

तर मित्रांनो आजच्या या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो. म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३ तसेच हरितालिका व्रत का करावे कसे करावे व त्याची सामग्री याबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

….

 हरितालिका व्रत 2023 :

देशाच्या अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत या वर्षी सोमवारी 18 सप्टेंबर 2023 रोजी केले जाईल.

 

हरितालिका  हे नाव का पडले असावे :

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. शिवा भूत्वा शिवां यजेत् ! या भावनेने हरितालिकेची पूजा करावी गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरितालिका” किंवाअसे म्हटले जाते .त्याचप्रमाणे हरितालिका ला “हरतालिका” असेही संबोधले जाते .

 

हरितालिका व्रत का करावे ?

शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्त्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची असते असे म्हणले जाते . या उपवासाची तयारी सकाळपासून सुरू केली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते. तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो असे मानले जाते .

हरितालिका व्रता बद्दल :

कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत या वर्षी सोमवारी 18  सप्टेंबर 2023 रोजी केले जाईल. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात. साज श्रृगांर करतात. पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिव पार्वतीची प्रतीमा ठेवतात. यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो. रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन किर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात.

हरितालिका व्रत नियम :

    1. हरीतालिका चा उपवास निर्जला केला जातो, म्हणजेच पुढच्या सूर्योदयापर्यंत दिवसभर आणि रात्रभर पाणी पिले जात नाही.
    2. हरीतालिका व्रत अविवाहित मुली, विवाहित महिला करतात.विधवा स्त्रिया देखील करू शकतात.
    3. हरीतालिका व्रताचा नियम असा आहे की एकदा सुरू झाल्यावर त्याचा त्याग करता येत नाही. हे दरवर्षी पूर्ण नियमांसह केले जाते.
    4. हरीतालिका व्रताच्या दिवशी रात्रभर जागल्या जाते. रात्रभर स्त्रिया एकत्र जमून नाचतात, गातात आणि भजन करतात. नवीन कपडे परिधान करून पूर्ण श्रृंगार करतात.
    5. जिथे जिथे हरीतालिका व्रत पाळले जाते. तेथे ही पूजा नाकारता येत नाही, म्हणजेच ती परंपरा म्हणून दरवर्षी केली जाते.
    6. साधारणपणे स्त्रिया मंदिरात ही हरतालिका पूजा करतात.

 

हरितालिका व्रताची सामग्री :

फुलं, केळीचे पान, सर्व प्रकारची फळे आणि फुले, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं,, श्रीफळ आणि दातुराची फुले, एकवान फूल, तुळशी, नाडा, कपडे, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, मेण, काजळ, बिंदी, कुंकु, सिंदूर, कंगवा, माहूर, मेहंदी इत्यादी विश्वासानुसार गोळा केल्या जातात.हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, तूप, तेल, दिवा, कापूर, अबीर, चंदन, कलश. पंचामृत – तूप, दही, साखर, दूध, मध.

 

Hartalika Vrat Katha in Marathi। हरितालिका व्रताची कहाणी

 

जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, , देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे.

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं ब्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एकादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक.हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या बापाला फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”

हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.

दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे

“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

 

Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३ 
Hartalika Vrat Katha In Marathi । हरितालिका व्रताची कहाणी २०२३

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न : 

हरतालिका केव्हा साजरा करतात ?

भाद्रपद शुद्ध तृतीयेला

हरतालिका उपवास ला काय खावे ?

भगर, अननसाचा भात, भगर शिरा, खजूर खसखस खीर, पियूष यापैकी एक हरतालिका उपवासाला खावे.

हरतालिका उपवास का करतात ?

कुमारिका आपल्याला शिवा सारखा पती मिळावा म्हणून हा उपवास करतात. तर आपलं मनोव्रत पूर्ण झालं म्हणून सौभाग्यवतींनीही ही पूजा करतात. तसेच ज्यांचे पती हयात नाहीत. त्यांनी उपोषण म्हणून हे व्रत करतात.

 

हरितालिका व्रताची कहाणी विडिओ माध्यमातून :

Video Credit : made for marathi Youtube Channel 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :

हरतालिका व्रत
हरतालिका व्रत कथा / हरितालिका व्रताची कहाणी मराठी / hartalika …
Hartalika 2023 : हरतालिका व्रत का साजरं करतात? काय आहे …
हरतालिका व्रत कथा 2023| Hartalika Vrat Katha In Marathi
हरतालिकेची कहाणी (Hartalika Teej Vrat Katha) PDF Marathi
Hartalika 2023 | Hartalika Vrat Katha In Marathi

आमचे इतर काही  पोस्ट : 

Ram Raksha Stotra Benefits In Marathi | रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थ व फायदे

भारतीय संस्कृती मराठी महिती | Bharatiy Sanskruti In Marathi

शाहू महाराज माहिती मराठी । Shahu Maharaj Information In Marathi

Ukhane Marathi। Marathi Ukhane For Female। Marathi Ukhane For Male

एड्स मराठी माहिती। Aids Marathi Mahiti

Benefits of Ajwain in Marathi |ओव्याचे फायदे ,उपयोग व नुकसान

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment