भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar 

भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar  

Contents hide
1 भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar
1.3 2) अर्थालंकार :

 

भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar 
भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar

अलंकार म्हणजे काय ?

भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात .

अलंकार म्हणजेच सुंदर दिसण्या साठी वापरलेलं दागिने भूषण होय. स्त्रिया सुंदर दिसण्या साठी चांगली केशभूषा वेशभूषा तसेच दागिने वापरतात त्याच प्रमाणे भाषा लेखन सुंदर आणि वाचण्या साठी रंजक बनवण्यासाठी सुद्धा आकर्षक शब्दरचना केली जाते त्यालाच मराठी व्याकरण च्या भाषेमध्ये अलंकार असे म्हंटले जाते. मराठी व्याकरमध्ये अलंकार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ज्यावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तसेच शालेय परीक्षांमध्ये असतोच आणि त्यावर गुण सुद्धा महत्तवाचे असतात.

भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार पडतात.

    1. शब्दालंकार
    2. अर्थालंकार

1.शब्दालंकार:

या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते. शब्दालंकाराचे खालील प्रकार पडतात.

टीप : एकाच ओळीत एकपेक्षा अधिक अलंकार असू शकतात.

1) अनुप्रास अलंकार । Anupras Alankar : 

  •  कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हाअलंकार होतो.

उदाहरणे :

1) देवा दीनदयाळा ।

दूर द्रुत दास,

दुःख दूर दवडी,

शांतीच मज दे

…(द ची पुनरावृत्ती)

2) आज गोकुळात रंग खेळतो हरी ।

राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी। (ज ची पुनरावृत्ती)

3) बालिश बहु बायकांत बडबडला. (ब ची पुनरावृत्ती)

4) अनंत मरणें अधी मरावी,

स्वातंत्र्याची आस धरावी, मारिल मरणचि मरणा भावी, मग चिरंजीवपण ये बघ तें.

 

2) यमक अलंकार । Yamak Alankar 

  •  वेगवेगळे अर्थ असणाऱ्या; परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठरावीक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते, त्यास यमक असे म्हणतात.

उदाहरणे :

(1) सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ।

2) मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।

तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥

(3) कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला ।

हसले दुरून कोणी, जवळुन वार केला ।

3) श्लेष अलंकार। Shlesh Alankar 

  •  या अलंकारात एकच शब्द दोन अर्थानी वापरला जातो.

उदाहरणे :

1) ‘हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.’ (आयुष्य / पाणी)

2) श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न-वरी ॥

3) कुस्करु नका ही सुमने । जरि वास नसे तिळ यास,

तरी तुम्हास अर्पिली सु-मने ।। (फुले / चांगली मने)

4) मला एस.टी. लागते. (गरज असणे / त्रास होणे)

5) शंकरास पुजिले सु-मनाने,

6) मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही! (सूर्य-सोबती)

2) अर्थालंकार :

  • या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते

• महत्त्वाचे – उपमेय : मूळ वस्तू

उपमान : गुणाने अधिक असणारी वस्तू

1) उपमा अलंकार । Upama Alankar 

  • दोन वस्तूंमधील साधर्म्य/ सारखेपणा दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, गत, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो.

उदाहरणे :

1) असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी.

2) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी. 3) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ।

4) सुशीला गोगलगायीसारखी हळू हळू चालत होती.

5) आभाळागत माया तुझी, आम्हांवरी राहू दे ।

2) उत्प्रेक्षा अलंकार। Utpreksha Alankar 

  • उपमेय हे जणू उपमानच आहे, असे दर्शविण्यासाठी जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतो.

उदाहरणे :

1) हा आंबा जणू साखरच !

2) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू! 3) त्याचे अक्षर जणूकाय मोतीच !

4) आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण !

5) वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे ! मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे !

6) जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या ।

साधी निसर्गसुंदर भासे ती देवता जाणो वन्या ।।

7) हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

3) अपन्हुती अलंकार। Apanhuti  Alankar 

  • अपन्हुतीचा अर्थ लपविणे असा होतो. यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.

उदाहरणे :

1) सा आंबा नाही. ही साखरच आहे. (उपमेय मूळ वस्तू, उपमानउपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू)

2) हे हृदय नसे, परि स्थंडील धगधगते ।

(3) ओठ कशाचे? देठचि फुलले पारिजातकाचे ।

4) अनन्वय अलंकार। Ananvay Alankar 

  •  ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे.

उदाहरणे :

1) आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्यापरी ।

2) झाले बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परंतु यासम हा ।

3) आईसारखी आईच

4) सागरासारखा गंभीर सागरच !

5) या दानाशी या दानाहुन अन्य नसे उपमान

 

5) रूपक अलंकार । Rupak Alankar 

  • जेव्हा उपमेय आणि उपमान यांत भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. एखाद्या घटकाला दुसऱ्याच्या नावाने संबोधने

उदाहरणे :

1) तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे ।

2) वाघिणीचे दूध प्याले, वाघबच्चे फाकडे ॥

3) देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर 4) जिथे माणुसकीची यंत्रे अखंड चालू असतात.

(5) ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा || दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥

6) कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा

7) हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे

चाले रणकंदन ।

8) नवकमल हे उपहित हलके जागी हो जानकी।

6) अतिशयोक्ती अलंकार । Atishyokti Alankar 

  • एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, वाला अतिशयोक्तीअसे म्हणतात.

उदाहरणे :

1) जो अंबरी उफाळता खुर लागलाहे तो चंद्रमा निज तनूवरि डागलाहे.

2) ती रडली समुद्रच्या समुद्र.

3) तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.

4) दमडिचं तेल आणलं, सासूबाईच न्हाण झालं ‘मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली.

उरल तेल झाकून ठेवलं, सांडोरीचा पाय लागला

वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला,

5) एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेला

दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.

6) मुंगी उडाली आकाशी

तिने गिळिले सूर्यासी !

7) दुष्टांत अलंकार। Dushtanat Alankar 

  • एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. हा अलंकार साधर्म्यावर आणि वैधम्यांवर

आधारित भेद दर्शवितो. (किर्तनात दृष्टांत सांगितले जातात).

उदाहरणे :

1) लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

2) निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ।

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरागबाळाचे काम हे ॥

3) न कळता पद अग्नीवरी पड़े। न करि दाह असे न कधी घडे ।

अजित नाम वदो भलत्या मिसे । सकळ पातक भस्म करीतसे ॥

4) चंदनाचे हातपायही चंदन।

तुका म्हणे तैसा सज्जनापासून

पाहता अवगुण मिळेचिना

भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar
भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar

 

8) विरोधाभास अलंकार। Virodhabhas Alankar 

  •  वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.

उदाहरणे :

1) जरी आंधळी मी तुला पाहते.

2) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे।

3) मरणात खरोखर जग जगते ।

4) स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुऱ्यासाठी मेलास

खऱ्या अर्थाने जगलास !

9) चेतनागुणोक्ती अलंकार । Chetanagunokti Alankar 

  • निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतनागुणोक्ती अलंकार होतो.

उदाहरणे :

1) कुटुंबवत्सल इथे फणस हा ।

कटिखांद्यावर घेऊन बाळे

2) चाफा बोलेना, चाफा चालेना।

चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ॥

3) डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी;

4) धक्क्यावरच्या अजून बोटी साखरझोपेमधी फिरंगी

10) अर्थान्तरन्यास अलंकार । Athrntaranyas Alankar 

  •  एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थान्तरन्यास अलंकार होतो.

उदाहरणे :

1) कठीण समय येता कोण कामास येतो ?

2) अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा ।

3) फूल गळे, फळ गोड जाहले

बीज नुरे, डौलात तरु डुले

तेल जळे, बघ ज्योत पाजळे

का? मरीण अमरता ही न खरी ।

11 )स्वभावोक्ती अलंकार। Swabhavokti Alankar 

• जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब, पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात.

उदाहरणे :

1) अंग वक्र, अधरि धरी पावा

गोपवेष हरि तोची जपावा

वाम बाहूवर गालही डावा

2) चिमुकली पगडी झळके शिरी

चिमुकली तलवार धरे करी

चिमुकला चढवी वर चोळणा

चिमुकला सरदार निघे रणा ॥

3)  मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक.

(4) गणपत वाणी विडी पितांना, चावायचा नुसतिच काडी;म्हणायचा

अन् मनाशीच की, ह्या जागेवर बांधिन माडी.

12) व्याजस्तुती अलंकार। Vyajastuti Alankar 

  •  बाहेरून स्तुती; पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा; पण आतून स्तुती असेल तर व्याजस्तुती अलंकार होतो.

उदाहरणे :

1) होती वदन-चंद्राच्या दर्शनाचीच आस ती ।

अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती ? ॥

13) पर्यायोक्ती अलंकार। Pryayokti Alankar 

  • एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्षरीतीने सांगणे याला पर्यायोक्ती म्हणतात.

उदाहरणे :

1) तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस. (अशक्य गोष्ट)

2) तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे . ( तुरुंगात )

14)सार अलंकार । Sar Alankar 

  • वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो , तेव्हा सार हा अलंकार होतो . वाक्यातील कल्पना चढत्या व उतरत्या क्रमाने मांडल्या जातात .

उदाहरणे :

1) विद्येविना  मती गेली |

मतीविना नीती गेली।

नीतीविना गती गेली |

गतीविना वित्त गेले |

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

2) आधिच मर्कट तशातही मद्य प्याला

झाला तशात जरी वृक्षिक दंश त्याला

15) अन्योक्ती अलंकार । Anyokti Alankar 

  •  दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे  अन्योक्ती .ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे, परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती.

उदाहरणे :

1) सांबाच्या पिंडी बसशी खेटूनी वृक्षिका आज

परि तो आश्रय सुटता खेटर उतरील रे तुझा माज

2) येथे समस्त बहिरे बसतात लोक

का भाषणे मधुर तू करिशी अनेक

हे मूर्ख यासि किमपीहि नसे विवेक

रंगावरून तुजला म्हणतील काक

16) ससंदेह अलंकार । Sasandeh Alankar 

  •  उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी दुविधा अवस्था होते, त्या वेळी ससंदेह अलंकार होतो.

उदाहरणे :

1) हा दोरखंड की साप ?

2) कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नमीचा चंद्र कोणता वदन कोणते ?

17) प्रान्तिमान अलंकार। Prantiman Alankar 

  • उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे प्रान्तिमान अलंकार होतो.

उदाहरणे :

1) पलाशपुष्प मानोनि शुकचंचू मध्ये अलि तोही जांभूळ मानोनी,

त्यास चोचीमध्ये धरी ॥

2) भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे ।

पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे ॥

घालीन अंजन अशा मतिने तटाकी ।

कति वृथा उतरलो, भिजलो विलोकी ।

18) व्यतिरेक अलंकार । Vyatirek Alankar 

  •  उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते.

उदाहरणे :

1) अमृताहूनि गोड नाम तुझे देवा.

2) कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान

3) तू माउलीहून मवाळ । चंद्राहूनही शीतल ।

पाणियाहूनही पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।

4) चंद्राची युवतीमुखास उपमा देती कशाला कवी,

हे पूर्वी न मला रहस्य कळले,

चित्रातले हे मुख पाहूनी मजला अपूर्णचि गमे,

चंद्रास हे लाजवी की याच्यावर निष्कलंक विहरे बुद्धसवे कौतुके.

 

 

भाषा अलंकार व त्याचे प्रकार विडिओ माध्यमातून :

Video Credit : TikKar Marathi Youtube Channel 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा .

भाषालंकार
अलंकार व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Alankar In Marathi With …
मराठी व्याकरण- 9वी,10 वी- अलंकार
अलंकार व अलंकाराचे प्रकार-मराठी व्याकरण
Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि …

 

आमच्या आणखी काही व्याकरणाच्या पोस्ट : 

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

प्रयोग मराठी व्याकरण । प्रयोग व त्याचे प्रकार । Prayog Marathi

Appreciation Of Poem In Marathi । कवितेचे कौतुक किंवा कवितेची कृती

Jahirat Lekhan In Marathi। जाहिरात लेखन मराठी 

 


मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

 

 

Leave a Comment