शिक्षक निबंध | shikshak essay marathi
मनुष्यामध्ये व इतर प्राण्यामध्ये जे महदंतर आहे व ज्याच्या योगानें मनुष्य एवढ्या योग्यतेस चढला आहे त्याचे कारण त्याची अपूर्व बुद्धिमत्ता ही होय. ही अमोलिक देणगी मनुष्यास ईश्वराने दिल्यामुळे त्याने आज सर्व प्राण्यांवर आपली छाप बसविली आहे. इतर प्राण्यां- मध्ये एकप्रकारची उपजत बुद्धी दिसून येते. परंतु नियन मित मर्यादेपलीकडे त्यांच्या बुद्धीची वाढ होत नाहीं जरी काही जनावरांत भीती दाखवून अथवा संवयीनें मनुष्यप्राण्याप्रमाणे कृती करण्यास शिकवितां येतें तरी त्याचे करणे बुद्धीपुरःसर नसून केवळ संवयीने अथवा भीतीनें प्राप्त झालेले असतें.
शिकविल्यापेक्षां स्वबुद्धीनें त्यानां काहीही करितां येत नाहीं. परंतु मनुष्याची गोष्ट तशी नाही. शिक्षणाने मनुष्याचें मन प्रगल्भ होऊन त्याची बुद्धी वाढत जाते.
प्रत्येक मनुष्याचे त्याच्या देशासंबंधी मुख्य कर्तव्य पटले ह्मणजे आपल्या मुलांना उत्तमप्रकारचे शिक्षण देऊन त्याना सुलक्षणी करणें हैं होय. कारण मुलें हींच पुढील पिढीचे बाप होणार. याकरितां त्यांचे मन शिक्षणानें सर्व प्रकार सुधारल्यास ते आपल्या मुलांना सुलक्षण करतील व ही परंपरा कायम राहून देशाचे कल्याण होईल. याकरितां शिक्षण है सर्वप्रकारें करून मनुष्याच्या उन्नतीचे साधन आहे.
शिक्षण देण्यास योग्य काळ बाळपण हे होय. लहा- नपणीं मनुष्याच्या मनांत जशा लवकर गोष्टी भरतात तसें थोरपणी होत नाहीं. त्याचप्रमाणे मनुष्याचा स्वभाव संवयीमुळे लहानपणीच बनत चाललेला असतो याकरितां अशावेळी जर त्यांना उत्तम प्रकारचें नीतिशिक्षण वगैरे दिले तर त्यांचा स्वभाव उत्तम बनून त्यांचे व सर्व देशांच कल्याण होईल.
आपल्या लोकांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देणे ह्मणजे त्यांना कोठें तरी नोकरी करून पोट भरण्यास लायख करविणें असें दिसतें. ही किती भ्रांतिमूलक व मूर्ख- पणाची कल्पना आहे बरें ? याकारणामुळे आमचे लोक आपली मुले चारपांच वर्षाची झाली नाहीत तोच त्यांन शाळेत पिटाळून लावतात व त्यांच्या शरीरप्रकृतीकडे विक्कूक लक्ष न देता घाईनाईन त्यांना कोठे तरी नोकरीत गुंतवून टाकितात.
कोण ही शिक्षणाची अवहेलना, अशामुळे देशाने कल्याण कधीं तरी होईल काय ? शिक्षण ह्मणजे केवळ पोटापुरती विद्या नसून त्याच्या योगानें मनुष्याला ह्या जगांमध्ये सर्व प्रकारचा अनुभव आला पाहिजे, त्याचं मन प्रगल्भ झाले पाहिजे. तरच कल्याण होईल.
आपल्यामध्यें मुलाला लहानपणापासून शाळेत घातल्या- मुळे फार नकसान होत आहे. आपल्या देशामध्ये शिकणारे लोक ह्मणजे विशेष करून ब्राह्मण हे होत. सर्व ब्राह्मण हे सरकारी अथवा दुसन्या कोठेही चाकरीस राहतात यामुळे ते दिवसा क्वचितच घरांत असतात. ह्मणून आपली मुलें कोठें तरी भटकत फिरत राहतील यासाठी त्यांना शाळेत हाकलून देतात.
ज्या वयामध्ये त्यांच्या स्वभावाला स्वातंत्र्याचे वळण लागत असते अशावेळीं जर त्यांना शाळेमध्ये कोंडून ठेविलें तर त्यापासून केवढे नुक- सान होत याचा कोणी विचार केला आहे काय ? आम च्यामध्ये गृहशिक्षणाची फार उणीव आहे यामुळे आमचीं मुळे जशी उद्योगी वगैरे व्हावीं तशी होत नाहींत. आम- च्यांतील पुरुषांना बहुतेक फावत नाही यामुळे बायका जर चांगल्या सुशिक्षित होतील तर मुलगा आठ वर्षाचा होईपर्यंत त्यास सर्वप्रकारचे गृहशिक्षण देण्यास त्या हयगय करणार नाहीत व त्यापासून मुलांचे हित होईल.
मातेव रक्षति पितेव हिते नियुंक्ते कान्तेवचापि रमयत्यपनीय खेदं ॥
लक्ष्मीं तनोति वितनोतिच दिक्षकीर्ति । किं किं न साधयति कल्पलतेवविद्या ॥ १ ॥
वरील हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वि ची मुलं आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.