Abhinandan Patra Lekhan In Marathi। अभिनंदन पत्र लेखन मराठी

Abhinandan Patra Lekhan In Marathi। अभिनंदन पत्र लेखन मराठी

 

Abhinandan Patra Lekhan In Marathi। अभिनंदन पत्र लेखन मराठी
Abhinandan Patra Lekhan In Marathi। अभिनंदन पत्र लेखन मराठी

 

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात अभिनंदन पत्र कसे लिहावे . याबद्दल जाणून घेणार आहोत.आज या लेखात आपण Abhinandan Patra Lekhan In Marathi अभिनंदन पत्र लिहिताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे, अभिनंदन पत्राचे काही महत्त्वाचे नियम तसेच अभिनंदन पत्राचे सर्वोत्तम नमुने या ठिकाणी बघणार आहोत.

 

अभिनंदन पत्र कसे लिहावे ?

 

(१) पत्राच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याने आपले नाव पत्ता लिहावा. पत्त्याखाली दिनांक लिहावा.

(२) दिनांक नंतर खालच्या ओळीत डाव्या बाजूला ‘प्रति’ हा शब्द लिहून, त्याखाली पत्र ज्या

व्यक्तीला लिहायचे आहे. त्याचे नाव हुद्दा व त्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा.

(३) त्यानंतर ‘विषय’ हा शब्द लिहून त्यापुढे पत्र कशाविषयी आहे, ते मोजक्या चार-पाच शब्दांत मांडावे.

(४) विषयानंतर पुन्हा डाव्या हाताला आदरयुक्त शब्दांत मायना लिहावा.

(५) सायन्यानंतर स्वतंत्र परिच्छेदाने मुख्य मजकुराला आरंभ करावा,

(६) मजकुराचे मुद्दयांनुसार परिच्छेद पाडावेत.

(७) पत्रातील मजकुराचे परिच्छेद शक्यतो ३ किंवा ४ पेक्षा अधिक नसावेत.

(८) पत्राचा समारोप उजव्या बाजूला करून त्याखाली स्वाक्षरी म्हणजे पत्रलेखकाचे नाव लिहावे.

(९) प्रश्नपत्रिकेतील प्रश्नात पत्रलेखकाचे आणि पत्र ज्याला लिहायचे त्याचे नाव व पत्ता दिलेला असेल, तर पत्रात त्याचा योग्य जागी उपयोग करावा अन्यथा ‘अबक’ यांसारखी अक्षरे लिहावीत.

(१०) आवश्यक असल्यास पत्राखाली पत्रासाठी लिफाफा (पाकीट) तयार करावा आणि त्यात प्रति व

प्रेषक या स्वरूपात (प्रश्नात) दिलेली नावे व पत्ते अवश्य लिहावे

 

अभिनंदन पत्र लेखनाचे नियम 

 

१ ) अभिनंदन पत्राची सुरूवात आणि शेवट प्रभावी असावी.

२ ) अभिनंदन पत्र काही नियमांमध्ये बांधली असतात.

३ ) अभिनंदन पत्र लिहिताना सोज्वळ भाषा वापरावी.

४ ) अभिनंदन पत्राची भाषा सोपी, स्पष्ट आणि सुंदर असावी.

५ ) पृष्ठाच्या डाव्या बाजूला मार्जिनसह पत्र लिहा.

६ ) पत्र एका पानावर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे . 

 

 

अभिनंदन पत्र लेखनाचे उदहारणे 

 

Abhinandan Patra Lekhan In Marathi
Abhinandan Patra Lekhan In Marathi

 

 

Abhinandan Patra Lekhan In Marathi। अभिनंदन पत्र लेखन मराठी

 

प्रश्न : कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तुमच्या मित्राला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

नारायण निवास,शनवार पेठ

सातारा शहर ,सातारा

दि. ३-१०-१४

प्रिय अमोल,

सप्रेम नमस्कार.

‘अजिंक्यतारा’ वृत्तपत्राच्या आजच्या अंकात वक्तृत्व स्पर्धेतील तुझ्या यशाचे वृत्त वाचले. सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी झाली. त्या निमित्ताने झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आला, हे वाचून अतिशय आनंद झाला. खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे हं ही !

तू रयत संस्थेच्या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी तुला आदर वाटणे स्वाभाविकच आहे. पण आम्हांलाही रयत शिक्षण संस्थेविषयी आणि भाऊरावांविषयी नितांत आदर आहे; कारण ते खरेखुरे कर्मवीर होते.

अमोल, मला माहीत आहे की खूप मेहनतीने तू आपल्या वक्तृत्वकलेचा विकास केला आहेस. वेळोवेळी तू सभांतून भाषण करत असतोस. यामुळेच आज तू शंभरसव्वाशे विदयाध्यात पहिला आलास. दुसरे असे की, भाषणाचा विषय देखील तुझ्या जिव्हाळ्याचाच होता.

मला माहीत आहे, तू खूप कष्टाने शिक्षण घेत आहेस. घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नसताना तू सतत प्रगती करत आहेस. त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.

यापुढेही तुला वेळोवेळी असेच यश मिळत जावो, अशा सदिच्छा व्यक्त करून हे पत्र पूर्ण करत आहे.

तुझ्या ती. स्व. आईबाबांना सप्रेम साष्टांग नमस्कार.

 

 

तुझा दोस्त,

अ ब क 

धन्यवाद


अभिनंदन पत्र लेखन विडियो मध्यमातून 

Video credit : Snehankur Deshing Youtube channel

 

आमचे इतर पत्र लेखनाचे पोस्ट : 

Abhinandan Patra Lekhan In Marathi – अभिनंदन पत्र

Abhinandan Patra Lekhan  अभिनंदन पत्र उदाहरण

घरगुती पत्र कसे लिहावे ? व उदारणे

मराठी पत्र लेखन कसे करावे ?

Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?

Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ?

 

आमच्या आणखी काही पोस्ट :  

Millets Meaning In Marathi | Little Millet In Marathi

Self Obsessed Meaning in Marathi | Self Obsessed म्हणजे काय ? 

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

Benefits of Ajwain in Marathi | ओव्याचे फायदे ,उपयोग व नुकसान

भारतीय संस्कृती मराठी महिती | Bharatiy Sanskruti In Marathi

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment