माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध
मित्रानो , या पोस्ट मध्ये माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे मराठी निबंध लेखन / Dr.Vikas Amate Essay 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत.
…
आजचे युवक अनेक वेळा अशी तक्रार करतात की, आज आमच्यापुढे उत्तुंग आदर्श नाहीत. आमचा भोवतालचा समाज चंगळवादी आहे, भ्रष्टाचारी आहे. ते फक्त स्वतःसाठी जगतात. मग आम्हांला इच्छा असली, तरी मार्ग सापडत नाही. अशा या कुरकुरणाऱ्या तरुणांना सांगावेसे वाटते की, अरे जरा भोवताली पाहा.
आजही तुमच्याभोवती आहेत खरेखुरे ‘आयडॉल्स’. ते स्वतःसाठी जगत नाहीत, तर आपल्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा उपयोग इतरांसाठी करतात अशाच आदर्शापैकी एक आहेत- डॉ. विकास आमटे. डॉ. विकास आमटे यांना बाबा आमटे आणि साधनाताई आमटे या त्यांच्या मातापित्यांकडून फार मोठा वारसा लाभला आहे. या दोघांची उत्तुंग साधना त्यांनी जवळून पाहिली.
आनंदवनातील काम ते रोज पाहत होते. ते काम करीतच ते मोठे झाले. तिथे राहूनच त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. पण शहरात राहून मोठी धनसंपत्ती वा सत्तेचे पद मिळवण्यामागे ते लागले नाहीत, तर आनंदवनात राहूनच आपल्याला तेथील कार्य पुढे कसे नेता येईल. याचाच विचार ते करू लागले
डॉ. विकास आमटे यांनी ‘कुष्ठरोग’ या विषयाचा अधिक अभ्यास केला व तेथे राहणाऱ्यांचे जीवन अधिक सुखी, स्वावलंबी कसे करता येईल, याचा विचार केला. कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी व इतर निराधार मुलांसाठी त्यांनी ‘गोकुळ’ उभे केले. त्यांच्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि ‘आनंद निकेतन कॉलेज’ सुरू केले. तेथील महाविद्यालयात सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि कृषी या चारही शाखांचे अध्ययन होते.
आसपासच्या गावांतील मुलेही तेथे शिकायला येतात. त्यामुळे कुष्ठरोगी व आसपासचे गावकरी यांच्यातील अंतरही कमी झाले आहे. त्याशिवाय अंध, मूक बधिरांच्या शिक्षणाचीही येथे सोय झाली आहे. येथे विविध उद्योगांचे शिक्षणही दिले जाते. सूतकताई, विणकाम, संगीत यांचे शिक्षणही त्या विदयार्थ्यांना येथे मिळते.
डॉ. विकास आमटे यांनी येथील विद्यार्थ्यांचा एक वाद्यवृंद तयार केला आहे. त्यांत दोनशे जण सहभागी होतात व पारंपरिक वाद्यांबरोबर तालवादये, सिन्थेसायझरसारखी आधुनिक वादये वाजवली जातात. अपंगांना संधी दिली पाहिजे, त्यांना उत्तम जीवन जगता आले पाहिजे, असे मानणाऱ्या डॉ. विकास यांनी त्यांच्यासाठी ‘संधिनिकेतन’ निर्माण केले आहे.
डॉक्टरांचे हे कार्य पाहिल्यावर अमेरिकेतून आलेल्या तारनोव्हस्की यांनी लेख लिहिला, ‘आनंदवन : आमटेज मिरॅकल’ व आपल्या ‘अनबीटन ट्रॅक’ या पुस्तकाची रॉयल्टीची रक्कम आनंदवनाला दिली. आनंदवनातील संधिनिकेतनात अपंगांना प्रशिक्षणही मिळते आणि कामही मिळते.
डॉ. विकास आमटे यांनी अपंगांना घरबांधणीच्या कामातही तरबेज केले व त्या तरबेज अपंगांनी किल्लारी येथे भूकंपानंतर आपले कसब दाखवले. डॉक्टरांनी शेतकीतही अनेक प्रयोग केले. त्यामुळे आनंदवनाच्या ओसाड जमिनीत | उगवत नाही असे काही दाखवता येणार नाही. नुसत्या मोगऱ्याच्या विक्रीतून त्या मंडळींनी लाखभर रुपये मिळवले.
भाकड गुरांना हत्येपासून वाचवून जीवनदान दिले व त्यांच्या शेणाचा उपयोग खत आणि गोबर गॅससाठी केला. डॉ. विकास आमटे यांनी ‘युवाग्राम’ वसवून तरुणांना नवी उमेद दिली. डॉक्टरांचे जीवन हे अशा प्रकारे अनेकांना कसे जगावे, याचा उत्तम आदर्श ठरले आहे
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता
-
माझा आवडता समाजसेवक निबंध । Majha Avadata Samajsevak Essay
-
बाबा आमटे मराठी निबंध । Baba Amate Marathi Esaay
-
बाबा आमटे यांच्या विषयी माहिती । Baba Amte Biography in Marathi
-
Baba Amte Information in Marathi । बाबा आमटे मराठी माहिती
-
माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध
बाबा विकास आमटे यांची कविता
बाबा विकास आमटे यांच्या सुंदर अशा चार ओळी आपल्यासाठी प्रस्तुत करत आहोत .
झेपावणार्या पंखांना क्षितिजं नसतात,
त्यांना झेपेच्या कवेत येणारे आकाश असते.
सृजनशील साहसांना सीमा नसतात,
त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते.
अशी सृजनशील साहसे हवी आहेत,
जी बीजे पेरून बाट पाहू शकतील,
जी भाग ठेऊन भविष्य आखतील,
अन् बेभान होऊन वर्तमान घडवतील…..
. – बाबा आमटे.
बाबा विकास आमटे यांचे कवी म्हणून या नात्याने प्रकट झालेले रूप रहस्यमही आहे. १९६५ च्या दरम्यान त्यांच्या कविता ‘ज्वाला आणि फुले’ या खूप प्रसिद्ध व्हायच्या. कवितेसाठी चिंतन हे बाबांचे असायचे आणि शब्दांकन रमेश गुप्ता यांचे होते. त्यांना बाबांनी “माझ्या स्वप्नांचे सहोदर” असे संबोधले आहे. पुढे हा संग्रह प्रसिद्ध झाला. बाबा आमटे यांची जीवनधारा आणि त्यांची काव्यधारा यांत अद्वैत आहे.
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणातही पुढेच माझी धाव
‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘माती जागवेल त्याला मत’ आणि ‘करुणेचा कलाम’ या बाबांच्या पुढील कवितासंग्रहांमधून ध्येयनिष्ठेने भारावलेल्या आणि ध्यासाने झपाटलेल्या प्रगल्भ आणि परिणत आत्म्याचे प्रकटीकरण आढळते. ‘गर्भवतीचा मृत्यू’ या कवितेत ते म्हणतात.
गर्भवतीचा मृत्यू कविता
शांतिनिकेतनातील अश्वत्थवृक्षांच्या सावल्या
आणि साबरमतीचा किनारा
यांच्या मीलनाचा अपूर्ण गर्भ
त्या मातेच्या पोटात होता
आमच्या सासुरवासाचा जाच असह्य होऊन
एक दिवस भान जागते ठेवून
तिने अंधार्या आडात उडी घेतली
संभवाच्या कळा उराशी सोसत
विलयाच्या वाटेने ती एकाएकी निघून गेली.
. – बाबा आमटे.
या संग्रहातील ‘एकलव्य’, ‘या सीमांना मरण नाही’, ‘श्रमसरितेच्या तीरावर क्रांतीची पावले’ आणि ‘विश्वमित्र’ या कवितांत प्रचितीचे बोल आहेत. बाबा आमटे यांच्या जीवनप्रवासातील पाऊलखुणांचे येथे दर्शन घडते.
आमच्या इतर निबंध पोस्ट :
-
संत जनाबाई निबंध – Sant Janabai Essay
-
संत गाडगेबाबा निबंध – Sant Gadagebaba Nibandh
-
माझा आवडता लेखक- पु. ल. देशपांडे
-
महात्मा जोतीराव फुले – Mahatma Jotirav Phule
-
कर्मवीर भाऊराव पाटील-Karmvir Bhaurav Patil
टीप :
1 ) माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .
मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद.