Marathi Kadambari List With Author। मराठी कादंबरी व लेखक

Marathi Kadambari List With Author। मराठी कादंबरी व लेखक

 

Marathi Kadambari List With Author। मराठी कादंबरी व लेखक
Marathi Kadambari List With Author। मराठी कादंबरी व लेखक

 

 

मित्रांनो आजच्या कादंबरी व लेखक  या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो. म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठी भाषेमध्ये कादंबरी कशाला  म्हणतात ? तसेच  कादंबरीचा इतिहास ,प्रकार ,घटक आणि कादंबरी व त्यांचे लेखक त्याचप्रमाणे काही गाजलेल्या प्रसिद्ध कादंबयऱ्यांची थोडक्यात माहिती सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

कादंबरीची व्याख्या : 

अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.

कादंबरीचा इतिहास : 

पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक – बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.

पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक – विनायक कोंडदेव ओक

पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (इ.स. १८९३), लेखक – हरी नारायण आपटे

भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी कादंबऱ्या : 

  1. कसे दिवस जातील (न. वि. कुलकर्णी ) : यांचा खेडूत सृष्टीचे कादंबरीकर म्हणून गौरव झाला आहे. त्यांची “मजूर”(१९२५) ही कामगार जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे.

     २. माकडीची माळ (अण्णा भाऊ साठे ) : या कादंबरीत उपेक्षितांच्या जीवनातील वास्तव्य शब्दबद्ध केले आहे..

      ३. ब्राह्मणकन्या ( श्री.व्यं. केतकर ) : कालिंदी या तरुणीची बंडखोर कहाणी या कादंबरीत वर्णिली आहे.

 

कादंबरीचे प्रकार : 
  • सामाजिक
  • ऐतिहासिक
  • पौराणिक
  • ग्रामीण
  • दलित
  • वास्तववादी
  • राजकीय
  • समस्याप्रधान
  • शेेतकरीवादी
  • बालकादंबरी
  • वैज्ञानिक 
  • कौटुंबिक

 

 कादंबरीचे घटक :

कादंबरी हा जीवनाशी समांतर जाणारा वाङ्मयप्रकार आहे. जीवनातल्या लयीप्रमाणे हा वाङ्मयप्रकारही लयबद्ध होतो. अशा या वाङ्मयप्रकाराच्या विकसनाचा व लेखनपद्धतींचा इथंपर्यंत आपण विचार केला. यानंतर अभ्यासाच्या दृष्टीने चर्चा करण्यास सोयिस्कर अशा कादंबरीच्या घटकांचा आता आपण विचार करू. त्यामध्ये कथानक, पात्र निवेदन, आत्माविष्कार, कालाबकाश, भाषा इत्यादी घटकांचा समावेश आहे.

१. कथानक

कादंबरी हा विस्तृत अवकाश मांडणारा वाङ्मयप्रकार असल्यामुळे वरील घटक कादंबरीमध्ये असणे अपेक्षित आहे. कादंबरी हा निवेदनप्रधान वाङ्मयप्रकार असल्यामुळे त्यामध्ये सांगण्यासारखा भरपूर मजकूर असतो. या मजकूरालाच कथानक असे म्हटले जाते. काही कादंबऱ्यांना कथानक नसते पण अशा कादंबऱ्यांमध्ये देखील निवेदनयोग्य मजकूर असतो. या मजकूराचा घटना, प्रसंग, पात्रे, निवेदनपद्धती या सर्वांशी संबंध येतो किंवा असेही म्हणता येईल की, कथानकामध्ये या सर्वांचा समावेश होतो. कथानकामध्ये हे सर्व घटक एकसंघपणे येत असल्यामुळे कथानकास सुसूत्रपणा येतो.

थोडक्यात कथानक ही व्यापक गोष्ट आहे. म्हणून कथानकात कादंबरीतील पात्रे, निवेदन पद्धती, बातावरण निर्मिती दृष्टिकोन, भाषा या सर्वच घटकांचा समावेश होतो.

२. पात्र / व्यक्तिचित्रण

‘पात्र’ किंवा ‘व्यक्ती’ हा कादंबरीच्या रचनेचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कादंबरीचे कथानक ज्यांच्यामुळे घडते अशा मानवी, अमानवी व्यक्ती, परंतु व्यक्ती केवळ व्यक्ती म्हणून स्वतंत्र नसते तर ती भोवतालच्या समाजजीवनाचा एक घटक असतो. समाज हे व्यक्तीचे अधिष्ठान असते आणि समाजाला इतिहास असतो. अशा रीतीने ‘इतिहासातून प्रकटणारी सामाजिक संदर्भ अनुस्यूत असलेली व्यक्ती ही सर्व कलांची अधिष्ठात्री असते… कोणतीही व्यक्ती समाजात पूर्णपणे बिलीन होऊ शकत नाही. तशीच ती समाज इतिहासाच्या प्रवाहाशी किंवा व्यावहारिक संदर्भाशी पूर्णपणे फटकूनही राहू शकत नाही. म्हणून कादंबरीलाही आपोआपच सामाजिक परिणाम लाभते. कादंबरीमध्ये काही विशिष्ट व्यक्तीच चित्रित होत असल्या तरी व्यक्तींच्या संबंधीत घडलेल्या घटनांच्या माध्यमातून लेखक जीवनविषयक सत्यांची अनुभूती घडवू शकतो. म्हणजे पात्राचा प्रवास विशिष्टाकडून सामान्याकडे असा असतो.

कादंबरीकाराचा विशिष्ट दृष्टिकोन या पात्रांच्याद्वारे राबविला जात असतो. व्यक्ती समाज यांच्याशी कादंबरी हा साहित्यप्रकार निगडित असल्यामुळे व समाजामध्येही विविध प्रकारच्या व्यक्ती आढळतात. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती’ याप्रमाणे ‘व्यक्ती तितकी पात्रे’ असे म्हणावयास हवे.

३. निवेदन

कादंबरी हा निवेदनप्रधान वाङ्मय प्रकार आहे. कादंबरीला कथानक असते. हे कथानक निवेदन या प्रस्तुतीकरण पद्धतीच्या द्वारे सांगावे लागते. कोणतीही कादंबरी भाषिक निवेदनाच्या मदतीशिवाय वाचनीय रूप धारण करू शकत नाही. कादंबरीच्या रचनेत भाषिक निवेदनाला अतिशय महत्त्व आहे. कारण कादंबरीचा संपूर्ण पट बाचकांच्यासमोर उलगडण्यासाठी निवेदनाशिवाय दुसरा पर्याय नाही. कादंबरीच्यासमोर उलगडण्यासाठी निवेदनाशिवाय दुसरा पर्याय नाही. कादंबरीला आकार देणाऱ्या सर्व घटकांचा तपशील पुरविण्यासाठी कादंबरीकार ‘निवेदन’ ह्या साधनाचा उपयोग अतिशय सावधपणे करतो. निवेदन म्हणजे घटनांची मालिकाच होय.

कादंबरीमध्ये काही ठिकाणी ‘कथन’ असते तर काही ठिकाणी चित्रण कादंबरी नाटकासारखी समोर दिसत नसते. म्हणून ती कथन करावी लागते. किंवा निवेदन करावी लागते म्हणून कादंबरीच्या इतर घटकांच्या तुलनेत महत्त्वाचा व आधारभूत घटक म्हणजे निवेदन किंवा कथन होय. इत्यादी …..

 

Marathi Kadambari List With Author
Marathi Kadambari List With Author

 

लोकप्रिय मराठी पुस्तके

 

कादंबरी  लेखक 
श्यामची आई कादंबरी साने गुरुजी
मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंत
सूड कादंबरी बाबुराव बागुल
अमृतवेल कादंबरी वि.स. खांडेकर
ऋतुचक्र कादंबरी दुर्गा भागवत
रणांगण कादंबरी विश्राम बेडेकर
व्यासपर्व कादंबरी दुर्गा भागवत
संभाजी कादंबरी विश्वास पाटील
स्वामी कादंबरी रणजित देसाई
महानायक कादंबरी विश्वास पाटील
सिंहासन कादंबरी अरुण साधू
ययाती कादंबरी वि. स. खांडेकर
फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे
बॅरिस्टर कादंबरी जयवंत दळवी
कोतला कादंबरी भालचंद्र नेमाडे
पांगिरा कादंबरी विश्वास महिपती पाटील
गावचा टिनोपाल गुरुजी शंकरराव खरात
गोलपीठा कादंबरी नामदेव ढसाळ
बनगरवाडी कादंबरी व्यंकटेश माडगूळकर
एकेक पान गळावया कादंबरी गौरी देशपांडे
युगंधरा कादंबरी सुमती क्षेत्रमाडे
शेकोटी कादंबरी डॉ. यशवंत पाटणे
गाव पांढर कादंबरी आप्पासाहेब खोत
स्वप्नपंख कादंबरी राजेंद्र मलोसे
कल्पनेच्या तीरावर कादंबरी वि. वा. शिरवाडकर
छावा कादंबरी शिवाजी सावंत
पानिपत कादंबरी विश्वास पाटील
बाजिंद कादंबरी गणेश मानुगडे
श्रीमान योगी कादंबरी रणजित देसाई
युगांत कादंबरी संजय राउत
राधेय कादंबरी रणजित देसाई
महाश्वेता कादंबरी सुधा मूर्ती
कंपॅनिअन कादंबरी बाबा कदम
लास्ट बुलेट कादंबरी सुहास शिरवळकर
गारंबीचा बापू कादंबरी श्री. ना. पेंडसे
वारणेचा वाघ कादंबरी अण्णा भाऊ साठे
ब्राह्मणकन्या कादंबरी श्रीधर केतकर
वज्राघात कादंबरी हरि नारायण आपटे
रावण राजा राक्षसांचा कादंबरी शरद तांदळे
राऊ कादंबरी ना. सं. इनामदार
चक्रव्यूह कादंबरी डॉ. निलेश राणा
अग्निपंख कादंबरी डॉ. अब्दुल कलाम
यमुना पर्यटन कादंबरी बाबा पद्मंजी
कालिंदी कादंबरी जगन्नाथ कुंटे
हिरण्यगर्भ कादंबरी सखाराम आठवले
तहान कादंबरी सदानंद देशमुख
मायबोली कादंबरी मनोहर सालफळे
पण लक्ष्यात कोण घेतो कादंबरी ह. ना. आपटे
झुंज कादंबरी एस. एस. कुलकर्णी
मर्मभेद कादंबरी शशी भागवत
बलुतं कादंबरी दया पवार
राजा शिवछत्रपती कादंबरी बाबासाहेब पुरंदरे
महानायक कादंबरी विश्वास पाटील
नटसम्राट कादंबरी विष्णू वामन शिरवाडकर
पडघवली कादंबरी गो. नी. दांडेकर
झोंबी कादंबरी आनंद यादव
उचल्या कादंबरी लक्ष्मण गायकवाड
व्हायरस कादंबरी जयंत नारळीकर
आनंद ओवरी कादंबरी दि.बा.मोकाशी
कमला कादंबरी कृपाबाई सत्यनादन
ग्रहण कादंबरी नारायण धारप
पर्व कादंबरी डॉ. एस.एल. भैरप्पा
मृगजळ कादंबरी सुनिल डोईफोडे
करंटा भाऊ पाध्ये
शाळा कादंबरी मिलिंद बोकील
बोभाटा कादंबरी नाथ माने
झाडाझडती कादंबरी

विश्वास पाटील

 

 

गाजलेल्या काही कादंबऱ्या व त्यांची थोडक्यात माहिती : 

ययाती कादंबरी : लेखक – वि . स . खांडेकर 

‘ ययाती ‘ मराठी भाषेतील एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. ययाति ही महाभारतातील राजा ययाति व देवयानी यांची प्रेमकथा आहे. लेखक वि. स. खांडेकर नुसार ययाती कादंबरी ही ययाती ची कामकथा, देवयानी ची संसारकथा, शर्मिष्ठाची प्रेमकथा आणि कचाची भक्तिगाथा आहे. या कादंबरीला उत्कृष्ट मराठी साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघी मैत्रिणी असतात व दोघंही यायाती राजाच्या प्रेमात पडतात. काही कारणामुळे यायातीचा विवाह देवयानीशी होतो व शर्मिष्ठा ही त्यांची दासी बनून येते. यानंतर शर्मिष्ठा व ययाति दोघेही पुन्हा एकदा प्रेमात पडतात. ययाती वासनेच्या या जाळेत अडकून सर्व नैतिक नियमांना विसरून जातो. आता हा कामुक, लंपट आणि संयम नसलेला ययाति वासनेच्या जाळ्यामधून कसा बाहेर निघेल? त्याला आपली चूक लक्षात येईल की नाही? हे तुम्हाला कादंबरी वाचल्यावर लक्षात येईल.

मृत्युंजय कादंबरी : लेखक – शिवाजी सावंत 

मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मृत्युंजय ही कादंबरी भारतीय कथा साहित्यामध्ये एका चमत्काराप्रमाणे आहे. या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मृत्युंजय ही कादंबरी महाभारतातील पात्र महारथी दानवीर कर्ण यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे. कर्णाबद्दल असलेल्या महाभारतातील कथा या कादंबरीत सांगितल्या गेल्या आहेत. शिवाजी सावंतद्वारे रचित मृत्युंजय ही करणाची अमरगाथा आहे.

छावा कादंबरी : लेखक – शिवाजी सावंत  

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आणखी एक अजरामर कादंबरी आहे. ही कादंबरी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवन पटावर लिहिलेली आहे. छत्रपती संभाजी हे शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव होते. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे ते फार पराक्रमी होते. शिवाजी सावंत यांनी आपल्या या कादंबरी मध्ये संभाजी राजांचे संपूर्ण जीवन चरित्र मांडले आहे.

पानिपत कादंबरी : लेखक – विश्वास पाटील 

पानिपत ही कादंबरी मराठा व अहमद शाह दुराणी (अफगाणी सैन्य) यांच्यात घडलेला पानिपतची तिसरी लढाई वर आधारित आहे. मराठा सैन्य सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली लढले. या पुस्तकात मराठा सैन्याचे शौर्य वर्णित करण्यात आले आहे.

श्यामची आई कादंबरी  : लेखक – साने गुरुजी 

पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात सानेगुरुजी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. आपल्या आई बद्दल असलेले प्रेम भक्ति व कृतज्ञता श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेली आहे. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिकच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी हे पुस्तक अवघ्या पाच दिवसात लिहून संपवले होते.

श्रीमान योगी’ कादंबरी : लेखक – रणजीत देसाई 

श्रीमान योगी’ हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेले आत्मचरित्र आहे. या पुस्तकात रणजित देसाई यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य व संपूर्ण जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहे.

 

Video credit : ROHIDAS CHONDHE PATIL Youtube channel

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :

सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे 
मराठी लेखक व त्यांची पुस्तके pdf
मराठी कादंबरी यादी व लेखक Marathi Kadambari List With Author
गाजलेल्या उत्कृष्ट मराठी कादंबरी ची यादी 
मराठी कादंबरी व लेखक

 

आमच्या इतर व्याकरण पोस्ट : 

मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi writers and their books

Appreciation Of Poem In Marathi । कवितेचे कौतुक किंवा कवितेची कृती

Jahirat Lekhan In Marathi। जाहिरात लेखन मराठी 

मुलाखत लेखन ९ वी ते १२ वी । मुलाखत लेखन नमुना 

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

प्रयोग मराठी व्याकरण । प्रयोग व त्याचे प्रकार । Prayog Marathi

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment